पिंपरी चिंचवड पोलिसांची कामगिरी दमदार:तब्बल 464 हरवलेल्या व्यक्तीचा लावला शोध

पिंपरी (वास्तव संघर्ष): लहान मुलांचे अपहरण करणे या अपहरणातून लाखो करोडो रूपयांची खंडणी गोळा करायची असा गोरखधंदा करणाऱ्या आरोपींना  पिंपरी चिंचवड पोलिसांच्या कामगिरीमुळे धडकी भरली आहे.तब्बल464 हरवलेल्या व्यक्तीचा शोध एका वर्षाच्या आत लावून  त्यांना सुखरूप घरी पोहचविणाऱ्या  पिंपरी चिंचवड पोलिसांवर शहरात कौतुकांचा वर्षाव होत आहे .

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत पोलीस तपासावरील हरवलेले, बेपत्ता असलेले पुरुष, महिला, लहान मुले यांचा तात्काळ शोध लागावा यासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पोलीस ठाणे स्तरावर विशेष मोहिम राबवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार भोसरी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली भोसरी पोलीस स्टेशन अंतर्गत विशेष शोध पथक तयार करण्यात आले. या पथकातील पोलीस अंमलदार सचिन जाधव यांनी भोसरी पोलीस स्टेशन येथे अभिलेखावरील मागील 27 वर्षांतील बेपत्ता व्यक्तींचा तांत्रीक विश्लेषणाव्दारे एक वर्षाच्या आत  एकुण 309 हरवलेले तसेच बेपत्ता असलेले पुरुष, महिला, लहान मुले यांचा यशस्वी शोध घेतलेला आहे.

तसेच 11 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर या कालावधीमध्ये मिसींग ड्राईव्ह आयोजित करून भोसरी पोलीस स्टेशनकडील एकूण 40 पोलीस अंमलदारांनी 200 पैकी 155 मिसींग व्यक्तींचा शोध लावून त्यांना त्यांचे कुटुंबियाकडे सुखरूप सुपूर्द केले. अशा प्रकारे भोसरी पोलिसांनी 464 हरवलेल्या व्यक्तींचा शोध लावला आहे.सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे,अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे,उप-आयुक्त परि-1 मंचक इप्पर,सहायक पोलीस आयुक्त डॉ.सागर कवडे ,पो.नि भास्कर जाधव, अरविंद पवार, भोसरी पोलीस ठाणेकडील विशेष शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच तांत्रीक विश्लेषन करिता चिंचवड पोलीस ठाणेकडील महिला पोलीस अंमलदार जामदाडे  यांनी विशेष मदत केली आहे . 


Share this: