रिक्षा स्टॅन्डजवळ थांबलेल्या तरुणाला लोखंडी पाईपने मारहाण

चिंचवड(वास्तव संघर्ष) : रिक्षा स्टॅन्डजवळ थांबलेल्या तरुणाला लोखंडी पाईपने मारहाण करून जखमी केले. एकमेकांकडे पाहात होते म्हणून हा प्रकार घडला. ही घटना बुधवारी (दि. 5) सायंकाळी पाच वाजता आनंदनगर रेल्वे पुलावर चिंचवड येथे घडली

विश्वनाथ साठे असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी छाया अशोक साठे (वय 40, रा. आनंदनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार अमोल सोनवणे, शुभम अडागळे व त्याच्या मित्रांच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी पाच वाजता फिर्यादी यांचा मुलगा विश्वनाथ साठे हा आनंदनगर रेल्वे उड्डाणपुलावर रिक्षा स्टॅन्डजवळ थांबला होता. त्यावेळी अमोल सोनावणे याच्याकडे विश्वनाथ याने पहिल्याच्या कारणावरून आरोपींनी विश्वनाथला शिवीगाळ केली. शुभम खंडागळे याने विश्वनाथच्या डोक्यात लोखंडी पाईपने मारले. यात विश्वनाथ गंभीर जखमी झाला. अन्य आरोपींनी त्याला मारले. अधिक तपास चिंचवड पोलीस  करीत आहेत.

Share this: