बातम्यामहाराष्ट्र

पुण्यातील बालेवाडी येथून अपहरण झालेला चार वर्षांचा ‘स्वर्णव’ चव्हाण अखेर सापडला

पुणे (वास्तव संघर्ष) : पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील बालेवाडी परिसरातून अपहरण झालेल्या चार वर्षाच्या मुलाचा शोध लागला आहे. दहा दिवसानंतर पुनावळे येथे तो सापडला असून अपहरणकर्ते पळून गेले आहेत.

स्वर्णव उर्फ डुगु चव्हाण असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे. दहा दिवसांपूर्वी त्याचे अपहरण झाले होते.


एक दुचाकीस्वार त्याला दुचाकीवरुन घेऊन गेला होता. याचे चित्रिकरण सीसीटीव्ही मध्ये झाले होते.डुगुचे अपहरण झाल्यापासून पुणे शहर पोलीस त्याचा शोध घेत होते. संपूर्ण पोलीस यंत्रणा त्याच्या शोधात लागली होती. अपहरणकर्त्यांनी कोणतीही मागणी किंवा फोन नातेवाईकांना केला नव्हता, त्यामुळे तपासात अडचण निर्माण झाली होती.डुगूचा शोध घेणे एक आवाहन निर्माण झाले होते. त्याच्या वडिलांनी सर्वपरी प्रयत्न सुरु केले होते. अखेर आज बुधवारी दुपारी डुगू पुनावळे परिसरात आढळून आला. अपहरणकर्ते त्याला सोडून पळून गेले आहेत.

Share this: