लग्नात ठरलेल्या हुंड्यापैकी उर्वरित हुंडा दिला नाही म्हणून विवाहितेचा छळ
चिंचवड (वास्तव संघर्ष) : लग्नात ठरलेल्या हुंड्यापैकी उर्वरित हुंडा दिला नाही, या कारणावरून विवाहितेचा शारिरीक आणि मानसिक छळ करण्यात आला. ही घटना 21 सप्टेंबर 2020 ते 17 डिसेंबर 2021 या कालावधीमध्ये इंदौर आणि केशव नगर, मुंढवा, पुणे येथे घडली.
याबाबत 40 वर्षीय विवाहितेने मंगळवारी (दि. 25) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
प्रवीण रतिलाल लोहार (वय 43), रतिलाल देवराम लोहार (वय 68), कल्पेश रतिलाल लोहार (वय 42, सर्व रा.केशवनगर, मुंढवा) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी आपसात संगणमत करून फिर्यादी यांना लग्नाच्या वेळी मागितला तेवढा हुंडा न दिल्याने त्यांचा वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ केला. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वाघुले याबाबत अधिक तपास करीत आहेत.