बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

झुंज दिव्यांग संस्थेने दिला दिव्यांग बांधवांच्या प्रश्नांना उजाळा

निगडी (वास्तव संघर्ष) : झुंज दिव्यांग संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि महामाता रमामाई भिमराव आंबडेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून दिव्यांग बांधवांच्या प्रश्नावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे,पालिकेचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे,नगरसेवक तानाजी खाडे, दिव्यांग हक्क समितीचे अध्यक्ष हरिदास शिंदे,तर या वेळी अनेक दिव्यांग बांधवानी कार्यक्रमाला हजेरी लावली.


यावेळी दिव्यांगांच्या घरकुल प्रश्नांवर चर्चा झाली तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील दिव्यांग बांधवांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाभ मिळण्यासाठी बॅंकेचे कर्ज धोरण, यामध्ये येणाऱ्या अडचणी कशा पद्धतीने दूर कराव्यात, लागणारे कागदपत्रे इत्यादी प्रश्नांसंदर्भात चर्चासत्र आयोजित करण्यात आले. यावेळी मुख्य मार्गदर्शन महापौर माई ढोरे व आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले,तसेच गरजू दिव्यांग बांधवांना सायकल वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे मुख्य संयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजू हिरवे संस्थेचे कार्याध्यक्ष राजेश दिवटे, महिला अध्यक्ष नूतन रोहमारे, दादासाहेब काशीद,काशिनाथ शेलार,बापू कडाळे यांनी केले.

Share this: