क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

‘त्या’ भोंदुबाबाचा झाला असा पर्दाफाश

पिंपरी (वास्तव संघर्ष) : ‘ तुमच्या घरावर काळी जादू केली आहे असे म्हणून एका महिलेवर भोंदूबाबाने बलात्कार केला आहे तसेच या महिलेकडून वीस लाख रुपये घेतले आहे.ही घटना गुरुवारी (दि.10) रोजी देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी भोंदू बाबाला अटक केली आहे.

पिडीत महिलेने याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

विनोद शंकर पवार ( वय 33 , रा . ज्योतिबानगर , काळेवाडी ) असे अटक केलेल्या भोंदूबाबाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत महिलेच्या घरात वारंवार कटकटी सुरु असल्याचे त्यांनी आरोपी विनोद याला सांगितले त्यानंतर आरोपी विनोद याने पिडीत महिलेला ‘ मी जादूटोणा व अघोरी विद्येचे काम करतो, मला तुमच्या घरी येऊन पहावे लागेल ‘ असे म्हणत आरोपी विनोद हा पिडीत महिलेच्या घरात आला .’तुमच्या घरावर काळी जादू केली आहे . त्यामुळे तुमच्या घरात रोज कटकटी होतात . तुमचा नवरा सात – आठ महिन्यापेक्षा जास्त जगणार नाही . त्याकरिता मला तुमच्या घराची बांधणी करून तांत्रिक विधी करावे लागेल ‘ असे म्हणून आरोपीने पिडीत महिलेकडून 30 हजार रुपये घेतले . त्यानंतर त्याने महिलेच्या घरात अघोरी पूजा केली .

त्यानंतर आरोपीने महिलेला काळ्या जादूची भीती दाखवून महिलेकडून तब्बल 20 लाख रुपये घेतले . महिलेला गुंगीचा पदार्थ खायला देऊन तिच्यावर बलात्कार केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसात तक्रार दिली त्यानंतर पोलिसांनी लक्ष घालून आरोपीला अटक केली . आरोपी विनोद पवार याच्या विरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात बलात्कार , फसवणूक , गुंगीचे औषध देणे , महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालणे व त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे . आरोपी पवार याच्या विरोधात यापूर्वी सांगली येथील कुलाप पोलीस ठाण्यात दरोडा आणि वाकड पोलीस ठाण्यात शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे.

सदरची कारवाई पिंपरी – चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे , पोलीस उप आयुक्त डॉ. काकासाहेब डोळे , सहा. पोलीस आयुक्त डॉ . प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोगदंड , वाकड पोलीस स्टेशनचे महिला पोलीस उप-निरीक्षक संगिता गोडे , खंडणी विरोधी पथकातील सहा. पोलीस उप- निरीक्षक अशोक दुधवणे , पोलीस अंमलदार किरण काटकर , प्रदीप गोडांबे , आशिष बोटके , अमर राऊत , प्रदीप गायकवाड , प्रदीप गुट्टे तसेच महिला सहायक कक्ष अनिता जाधव यांचे पथकाने केली आहे.

Share this: