‘वर्क फाॅर होम’ च्या नावाखाली महिलेची आर्थिक फसवणूक
हिंजवडी(वास्तव संघर्ष) : वर्क फाॅर होम च्या नावाखाली एका महिलेची एक लाख 38 हजारांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना ॲागस्ट 2021 रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास जय संतोषी माँ हाईट्स पी.जी. लक्ष्मी चौक,मारुंजी हिंजवडी येथे घडली आहे.
याबाबत एका महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
परितोष पासवान (रा. पासवान पो. भवानपुरा मनोजकार्तिक भागलपुर बिहार ) ब्रसेर टेक्नॉजी प्रा.लि.(रा. पहिला मजला फोर्थक्रास सेंकड नं. 432 ब्लॉकएचआरबीआर लेआऊट , कल्याणनगर बँगलोर)तसेच एका अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला मोनं 7037527960 या अनोळखी नंबरवरील व्यक्तीने Work From home nuÉ®ãú ebay288.com मध्ये पैसे गुंतवुणक करुन पार्ट टाईम नोकरी देतो असे सांगुन त्यांची एक लाख 38 हजारांची आर्थिक फसवणुक केली आहे तसेच ते पैसे आरोपी परितोष यांच्या अकांउंटवर पैसे जमा झाले आहेत. अधिक तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.