आरोग्यबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

आरोग्याविषयी जनजागृतीसाठी गुटख्याची होळी

पिंपरी (वास्तव संघर्ष) : राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने होळी सणानिमित्त गुटख्याची होळी करून व्यसनाधिनता सोडण्याचा संदेश देत समाजापुढे एक अनोखा आदर्श ठेवला.दरवर्षी पारंपरिक पध्दतीने साजरा होत असलेला होळीचा सण आता वेगवेगळ्या पध्दतीने साजरा केला जात आहे. होळीनिमित्त काही ठिकाणी वृक्षतोड करून होळी साजरी केली जाते. त्यामुळे वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जात आहे. मात्र या सर्व गोष्टीला फाटा देत आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी तंबाखु, सिगारेट,बिडी, गोवा-गुटखा, पानमसाला यांची प्रतिकात्मक होळी करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी युवती संघटना व युवक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीसाठी व धुम्रपानाची प्रतिकात्मक होळी पिंपरीतील संत तुकाराम नगर येथे राष्ट्रवादी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच वर्षा जगताप यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली होती.

मायला मामा खत्री,राजेंद्र भूते,पोर्णिमा कोल्हे,नेहा पडवळ,मेघना जगताप, प्रतिक अलिबागकर,चैतन्य सपकाळ,अमन शिकलगार,प्रज्वल जगदाले, आशीष शितोले,गौरव ढोरे,प्रथमेश जगताप, पवन गायकवाड,गणेश गायकवाड,वेदांत जगताप,सौरव ढेरे,साहिल जाधव,सुरज जाधव,रितेश बुरुड,मिथिल खांडेकर,अनुराग अभंग,यश मोरे,दुर्वेश मालुसरे,अस्लम शेख,आदित्य समिंद्र,प्रथमेश गायकवाड मान्यवरांसह अनेक पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

Share this: