बातम्या

आवास योजनेमधील लाभार्थ्यांना स्वहिस्सा भरण्यासाठी मुदतवाढ

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने केंद्रशासन व राज्य शासनाच्या सहकार्याने राबविण्यात येत असणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये लाभार्थी ठरलेल्या व प्रथम स्वहिस्सा रक्कम भरलेल्या चऱ्होली प्रकल्पातील लाभार्थ्यांना पुढील 40 %आणि बोऱ्हाडेवाडी प्रकल्पातील पात्र लाभार्थ्यांना 80% स्वहिस्सा रक्कम भरण्याची मुदत 15 एप्रिल 2022 पर्यंत वाढविण्यास आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी मान्यता दिली असुन या मुदतीत लाभार्थ्यांनी आपली स्वहिस्सा रक्कम भरावी असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये चऱ्होली 40 % आणि बोऱ्हाडेवाडी 80% स्वहिस्सा रक्कम भरण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागामध्ये चलन प्राप्त करुन 15 मार्च रोजी पर्यंत स्वहिस्सा रक्कम भरावी, अन्यथा लाभ रद्द करण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. या बाबतची माहिती व निवड झालेल्या लाभार्थ्यांचे नावाची यादी झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभाग 205 व्यापारी संकुलन,भाजी मंडई शेजारी चिंचवडगाव पुणे-33 या कार्यालयाच्या दर्शनी भागावर नागरीकांकरीता सुचना फलकावर लावण्यात आलेली आहे. तरी 15 मार्च रोजी पर्यंत लाभार्थ्यांनी स्वाहिस्सा रक्कम भरावी असे आवाहन करण्यात येत आहे.

Share this: