क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

सासरच्या ञासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेवुन केली आत्महत्या

देहूरोड (वास्तव संघर्ष) : सासरच्या ञासाला कंटाळून एका विवाहितेने गळफास घेवुन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि.27) रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास विकासनगर , देहुरोड येथे घडली आहे.

सुरेश गोपाळ भालेराव (वय-63, रा. वृंदावन हौसिंग सोसायती विकासनगर देहुरोड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पती मिलींद महेंद्र कांबळे( वय-35) व सासूला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन 2015 ते 2022 पर्यंत वेळोवेळी आरोपींनी फिर्यादी सुरेश यांच्या मुलीला शिवीगाळ, मारहाण करून, अपमानकारक वागणक देवुन तीचा शारीरीक , मानसिक छळ करून तीला क्रूर वागणुक दिली. या ञासाला कंटाळून फिर्यादी सुरेश यांच्या मुलीने गळफास घेवुन आत्महत्या केली. आरोपी पती आणि सासूला पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.

Share this: