क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करून अल्पवयीन मुलीची बदनामी

हिंजवडी (वास्तव संघर्ष) : इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करून ‘सेक्सी गर्ल’ हे टॅग लावून अल्पवयीन मुलीची सोशलमिडीयावर बदनामी केल्याप्रकरणी एकावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी ते मंगळवार रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान घडली आहे.

दत्तात्रय नवनाथ भस्मे ( वय-40, रा. रानवडे चाळ, कोयते वस्ती, पुनावळे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी वय वर्षे पंधरा हिचे इन्स्टाग्राम खाते हॅक करुन तिचे इन्स्टाग्राम आयडी व त्याचा पासवर्ड बदलुन त्याऐवजी नवीन खाते अ‍ॅड करुन त्यासोबत फिर्यादी यांची मुलगी हिचा फोटो व मोबाईल नंबर आणी त्या सोबत ‘सेक्सी गर्ल’ हे टॅग लावुन फिर्यादी यांची मुलगी हिचे सोशल मिडीयावर बदनामी करुन , तिचे मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तसेच सोशल मिडीयाच्या मार्फतीने फिर्यादी यांचे मुलीवर पाळत ठेवुन आणि फिर्यादी यांना देखील त्यांचे मोबाईलवर चालु असलेल्या व्हॉटसअप मोबाईल नंबरवर मेसेज आणि फोटो पाठवीले आहेत.आरोपी अटक नसून अधिक तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

Share this: