बातम्यामहाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

गहाळ राहू नका पालिकेच्या निवडणुका कधीही लागू शकतात :अजित पवार

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवडमधील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आज शनिवारी (दि. 6) रोजी घेण्यात आला होता. यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते अजीत पवार यांनी पालिकेच्या निवडणूकीच्या संदर्भात भाष्य केले आहे. ते म्हणाले आता तोच प्रभाग राहील की बदलेल याबाबत काहीही निश्चित सांगता येणार नाही. कोर्टाने सांगितलयं निवडणुक लावा. आधी निवडणूकीत तीनचा प्रभाग केला आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी तो  रद्द करत चारचा प्रभाग केला या केलेल्या प्रभागरचनेच्या बाजूने काहीजण कोर्टात गेले आहेत. कोर्टाला पटवून देण्यात अपीलकर्ते यशस्वी झाले तर निवडणुका कधीही लागू शकतात. त्यासाठी तुम्ही गहाळ राहू नका तयारीला लागा तयारी आताच करून ठेवा.  निवडणुकांचा ट्रेंड बदलतोय. शहरातील नागरिकांच्या राहणीमानात बदल झाला आहे. त्यांच्या गरजा बदलल्या आहेत. त्यामुळे वार्डात सूक्ष्म पद्धतीने नियोजन करा ”. ”आपली राष्ट्रवादी आपली पालिका” ही मशाल पेटवून कामाला लागा, असा कानमंत्र राज्याचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी शहरातील कार्यकर्त्यांना  यावेळी दिला.

यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, जेष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, आझमभाई पानसरे, संजोग वाघेरे, जगदीश शेट्टी, मंगला कदम, रविकांत वर्पे, वसंत बोराटे, विशाल वाकडकर, प्रशांत शितोळे आदि व्यासपीठावर उपस्थित होते.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, गैरसमज दूर होण्यासाठी संवाद आवश्यक आहे. सत्तांतर घडत असते. आपलं आपण काम करीत रहायचं. जनतेच्या प्रश्नांमध्ये लक्ष घाला. नव्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाची ध्येय धोरणे समजून घ्यावीत. अडीच वर्षे कोरोना संकट काळात महाविकास आघाडीने चांगले काम केलं आहे. जनतेला याची आठवण करून द्या. सध्या कोरोना कमी झाला असला तरी स्वाइन फ्ल्यू चे संकट वाढले आहे. स्वतःसह नागीकांमध्ये जनजागृती करा. जनता कोणालाही उलथून टाकू शकते. जनतेच्या मनातील आतल्या आवाजाला ओ देण्याच काम आपण सर्वांनी केल पाहिजे. देशाच्या परिवर्तनाचा, अभिमानाचा, स्वाभिमानाचा हा विचार आहे. हे काम लोकांपर्यंत न्या. ओबीसी आरक्षण हे महाविकास आघाडीचे यश आहे, कुणा एकाचे नाही. बूथमध्ये कमिट्या झाल्या पाहिजेत. सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या वार्डाचा अभ्यास करा. काही वार्डात परिपूर्ण रिसोर्स टीम तयार करा. त्यात डॉक्टरांपासून, वकील ते प्लंबरपर्यंतच्या व्यवसायीकांचा समावेश करा. प्रत्येक वार्डातील बलस्थानांचा अभ्यास करा. कमकुवत भागात वेगळे नियोजन करा. त्यामुळे चांगले यश मिळण्यासाठी मदत होणार आहे. युती की आघाडीचा निर्णय राज्य स्तरावर होईल. जिल्ह्याच्या ठिकाणी स्थानिकांना जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात येईल. राष्ट्रवादीला शहरात सर्वोत्तम होण्यासाठी पयत्न करा. 15 ऑगस्टला राष्ट्रध्वज घरोघरी लावा. सर्व महापुरुषांचे देशासाठी हे योगदान आहे त्याचा हा आनंदाचा क्षण आहे. निगडीतील भक्ती शक्ती येथे डौलाने राष्ट्रध्वज फडकला पाहिजे. त्यासाठी आयुक्तांना भेटा. घरघर राष्ट्रवादी पोहोचवा. ”आपली राष्ट्रवादी आपली पालिका” ही मशाल पेटवून कामाला लागावे. पालिकेत पक्षाला सत्तेवर नेण्यासाठी एकजुटीने काम करा. विजय आपलाच आहे. कष्ट करा संघर्ष केल्याशिवाय काही मिळत नाही.

अजित गव्हाणे म्हणाले, राज्यत काही दिवसांपासून अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांबाबत संभ्रम आहे. अजित दादांच्या नेतृत्वाखाली ओबीसीना न्याय मिळाला. भाजपने आपल्यामुळे हा निर्णय झाल्याची दवंडी पिटवली. त्यावेळी भाजप मात्र गुवाहाटी आणि गोव्याला फिरत होती. मात्र श्रेय घ्यायची जुनी सवय मोडत नाही. यंदाच्या निवडणुका चार, तीन, दोन की एक प्रभाग पद्धतीने होणार हा प्रश्न सोडा. पक्ष संघटनेत युवक, महिला आदींची ताकद वाढली आहे. काहीही झाले तरी महापालिकेत महापौर राष्ट्र्वादीचाच होणार आहे. त्यांना काय करायचे ते करू द्या. दोन मंत्र्यांचा चुकीचा कारभार जनता उघड्या डोळ्याने पाहतेय. आपली सत्ता येणारच आहे. 91 साली शहराने दादांना खासदार केल. दादा चुकीचे काम कधीच करीत नाहीत. सत्ता बदलताच आता आयुक्तांकडून दबावाखाली महापालिकेत पुन्हा चुकीचे काम होत आहे. पाच वर्षात भाजपने मोठा भ्रष्टाचार केलाय. शहराला अधोगतीकडे नेले.

Share this: