बातम्यामहाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

चांदणी चौकातील तो पूल 2 ऑक्टोबरला पाडणार;पिंपरी चिंचवडमधील वाहतूकीत बदल

पिंपरी (वास्तव संघर्ष): मुंबई बंगळूर महामार्गावरील चांदणी चौकातील जूना पूल 1ऑक्टोबर आणि 2 ऑक्टोबर 2022 या कालावधीमध्ये रात्री पाडण्यात येणार आहे.  हा पूल स्फोटकांद्वारे पाडण्यात येणार असल्याने या कामाच्या वेळी तसेच तेथील राडारोडा उचलण्याची कार्यवाही होईपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना तेथून प्रवास करण्यास मनाई करण्यात आले आहे. या बाबतचे आदेश पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी दिले आहेत.

पूल पाडण्याचे काम 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून ते 2 ऑक्टोबर सकाळी 8 वाजे पर्यंत अथवा अवश्यकतेनुसार सुरु राहणार असून या कालावधी मध्ये वाहनांना येथून प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने वाहतुकीच्या मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

मुंबई बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून मंबई कडून येणारी जड वाहतूक ही उर्से टोलनाका येथेच थांबविण्यात येणार आहे. साताऱ्याकडून येणारी जड वाहतूक ही खेड शिवापूर टोलनाक्याजवळ थांबविण्यात येणार आहे.मुंबई  बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील शिंदेवाडी ते उर्से टोलनाका या दरम्यान दोन्ही बाजूंनी सर्व प्रकारच्या जड वाहनांच्या वाहतुकीस बंदी करण्यात आली आहे.मुंबई बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील डुक्कर खिंड ते पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीतील घोडावत चौक या दरम्यान दोन्ही बाजूने सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतूकीस बंदी राहील.

                  वाहतूकीसाठी पर्यायी मार्ग
मुंबई कडून येणारी हलकी व प्रवासी चारचाकी वाहने उर्से टोलनाका येथून जुन्या पुणे मुंबई रस्त्याने भक्ती शक्ती चौक, नाशिक फाटा, बोपोडी चौक , इंजिनिअरिंग कॉलेज चौक, संचेती चौक, खंडोजी बाबा चौक, टिळक रोडने  जेधे चौक, पुणे सातारा रोडने कात्रज चौक, सरळ जिना कात्रज बोगदा मार्गे साताऱ्याकडे किंवा कात्रज चौक, नवले पूल डावीकडे वळून मुंबई बंगळूर राष्ट्रीय महामार्ग असा असणार आहे.

वाकड चौक डावीकडे वळून राजीव गांधी पुलावरून विद्यापीठ चौक, संचेती चौक, उजवीकडे वळून खंडोजी बाबा चौक, टिळक रोडने जेधे चौक, पुणे सातारा रोडने कात्रज चौक, सरळ जुना कात्रज बोगदा मार्गे साताऱ्याकडे किंवा कात्रज चौक, नवले पूल डावीकडे वळून मुंबई बंगळूरू राष्ट्रीय महामार्ग  
राधा चौक डावीकडे वळून बाणेर रोडने विद्यापीठ चौक, उजवीकडे वळून संचेती चौक, उजवीकडे वळून खंडोजी बाबा चौक, टिळक रोडने जेधे चौक, पुणे सातारा रोडने कात्रज  चौक, सरळ जुना कात्रज बोगदा मार्गे साताऱ्याकडे किंवा कात्रज चौक, नवले पूल डावीकडे वळून मुंबई बंगळूर राष्ट्रीय महामार्ग

वाहतूकीसाठी पर्यायी मार्ग साताऱ्याकडून मुंबईकडे जाणा-या हलक्या व प्रवासी चारचाकी  वाहनांकरिता

खेड शिवापूर टोलनाका, शिंदेवाडी, जुना कात्रज बोगदा, कात्रज चौक, पुणे सातारा रोडने जेधे चौक, डावीकडे वळून सारसबाग, पुरम चौक, डावीकडे वळून टिळक रोडने खंडोजीबाबा चौक, फर्ग्युसन रोडने विर चाफेकर चौक, डावीकडे वळून विद्यापीठ चौक, राजीव गांधी पुलावरून औंध वाकड रोडने वाकड चौक, डावीकडे वळून पुढे यु टर्न घेऊन मुंबई बंगळूर राष्ट्रीय महामार्ग,खेद शिवापूर टोलनाका, शिंदेवाडी, जुना कात्रज बोगदा, कात्रज चौक, डावीकडे वळून नवले पूल, वडगाव पूल अंडर पास , सिंहगड रोडने राजाराम पूल, डी.पी.रोड मार्गे नळस्टॉप ,लॉ कॉलेज रोड, सेनापती बापट रोड , विद्यापीठ चौक, राजीव गांधी पुलावरून औंध वाकड रोडने वाकड चौक, डावीकडे वळून पुढे यु टर्न घेऊन मुंबई बंगळूर राष्ट्रीय महामार्ग खेड शिवापूर टोलनाका , शिंदेवाडी, जुना कात्रज बोगदा, कात्रज  चौक, डावीकडे वळून नवले पूल, वडगाव पूल, वारजे पूल अंडरपास, आंबेडकर चौक, वनदेवी चौक, कर्वे पुतळा चौक,   नळस्टॉप,  लॉ कॉलेज रोड, सेनापती बापट रोड , विद्यापीठ चौक, राजीव गांधी पुलावरून औंध वाकड रोडने वाकड चौक, डावीकडे वळून पुढे यु टर्न घेऊन मुंबई बंगळूर राष्ट्रीय  महामार्ग असा बदल करण्यात आले असल्याचे पुणे शहर पोलीस वाहतूक विभाग शाखेच्या वतीने कळविण्यात आले आहे

Share this: