पिंपरी चिंचवडमधील दिव्यांगांचे होणार घरोघरी जाऊन सर्वेक्षण
पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभाग दिव्यांग कक्षाच्या वतीने विविध दिव्यांग कल्याणकारी योजना राबविणेत येतात. या योजनाअंतर्गत सोमवारी (दि.16) पासून 60 दिवसापर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील विविध दिव्यांग योजनांचा लाभ घेणा-या दिव्यांग व्यक्तींचा हयातीचा दाखल्या” बाबत त्यांचे घरोघरी जाऊन समक्ष सर्वेक्षण करणेत येणार आहे.
हे सर्वेक्षण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे लाभ घेणा-या व नोंदणीकृत असलेल्या मनपा हद्दीतील दिव्यांग व्यक्तींचे घरोघरी जाऊन अक्षांश व रेखांश वर (Latitude and longitude) नोंदी घेवून तसेच गुगल टेगिंग नुसार करणेत येणार आहे. यामध्ये दिव्यांग व्यक्तींचे फेस रिडींग, थम्ब इंम्ब्रेशन व आयरीस ओळख [Eyes] मार्फत ऑनलाईन नोंद घेणेत येणार असून तसेच त्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र / आधार कार्ड, UDID कार्ड, मतदान कार्ड इ. स्कॅन करून ऑनलाईन वर अपडेट करणेत येणार आहे. तसेच दिव्यांग व्यक्तींचा हयातीचा दाखल्यात दिव्यांग व्यक्तींचा फोटो, दिव्यांग प्रकारानुसार फोटो, फेस रिडींग, थम्ब इम्ब्रेशन व आयरीम ओळख [Eyes], लाभार्थ्यांचे नाव व पत्ता आधार नंबर, मोबाईल नंबर तसेच पालकांचे पूर्ण नाव, पत्ता व आधार नंबर मोबाईल नंबर याच्या नोंदी घेवून या नुसार सर्वेक्षण करणेत येणार आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील महानगरपालिकेकडे विविध योजनेत लाभ घेणारे दिव्यांग नागरीक यांना आवाहन करणेत येते की, हयातीचा दाखला सर्वेक्षण बाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने मे.आयएसएफ सर्व्हिसेस या संस्थेची नेमणूक केलेली असून संस्थेचे ओळखपत्र धारक सर्वेअर हे शहरातील दिव्यांग व्यक्तींच्या घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आहेत. त्यांना दिव्यांग नागरीकांनी सहकार्य करावे.
संबंधित सर्व दिव्यांग नागरीकांनी आपले मुळ आधारकार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र, UDID कार्ड, लाभार्थ्याचा मतदान कार्ड (वय वर्ष 18 पुढील ) तसेच पालकांचे मतदान कार्ड, राहण्याचा पत्ता पुरावा, मोबाईल नंबर इ. कागदपत्र सर्वेक्षण वेळी उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे.दिव्यांग नागरीकांनी हयातीचा दाखल्या बाबत होणा-या सर्वेक्षणाला महानगरपालिकेला सहकार्य करावे असे आवाहन समाज विकास विभाग, दिव्यांग कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.