क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सापडले लाखो रुपये

पिंपरी (वास्तव संघर्ष ):निवडणूक आणि पैसा हे समीकरणच बनलं आहे.त्यात आता चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक  आहे याच पार्श्वभूमीवर शहरात  पोलिसांनी गस्त वाढवली आहे. त्यात चिंचवडच्या दळवी नगरमध्ये 43 लाख रुपयांची रोकड सापडली जप्त केली आहे. ही रोकड नेमकी कशासाठी वापरली जाणार होती? किंवा कोणासाठी वापरली जाणार होती. हे चित्र अजूनही स्पष्ट झाले नाही.

सविस्तर माहिती अशी की, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील दळवी नगर परिसरात निवडणूक विभागाचे अधिकारी तपासणी करत होते. त्यावेळी एका कारमध्ये 43 लाख रुपयांची रोकड सापडली आहे. तसेच गाडीमध्ये धारदार हत्यारे देखील सापडली असून कार चालकाला ताब्यात घेऊन चौकशी सुरु करण्यात आली आहे.

Share this: