बातम्यामहाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

राहुल कलाटेंना अहंकार,लोक त्यांना स्वीकारणार नाही-आमदार रोहित पवार

पिंपरी (वास्तव संघर्ष):चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या निधनामुळे होत असलेल्या पोटनिवडणुकीच्या प्रचार सभेत राष्ट्रवादी चे आमदार रोहित पवार यांनी बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यावर निशाणा साधला आहे.चिंचवडमधील महाविकास आघाडी चे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ ते शुक्रवारी आले होते.

यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले,बंडखोर उमेदवार राहुल कलाटे हे अहंकाराची भाषा बोलत आहेत. त्यांना वीस हजार मते पडतील. नागरिक अहंकार स्वीकारत नाहीत.तसेच नाना काटे हे प्रचंड मतांनी विजयी होतील.जगताप कुटुंबाबद्दल नागरिकांमध्ये सहानुभूती आहे.

पण, भाजपाला आम्ही मत देणार नाही उलट राष्ट्रवादीला निवडून आणणार असल्याचे वातावरण नागरिकांमध्ये आहे. अजित पवार यांनी केलेला विकास हे नागरिक विसरले नाहीत.पुढे ते म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष हे काहीही बोलले तरी खरे होणार आहे का? उलट राष्ट्रवादी चा उमेदवार निवडून येईल आणि प्रदेशाध्यक्ष यांना झटका बसेल.

Share this: