बातम्या

ठाकरे गटाचे शहरप्रमुख सचिन भोसले यांच्यावर प्राणघातक हल्ला

पिंपरी (वास्तव संघर्ष): चिंचवड विधानसभा पोटनिडणुकीतील महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख सचिन भोसले यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. हा हल्ला अज्ञातांनी केला.त्यात भोसले जखमी झाले असून त्यांना बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना डांगे चौक मंगलनगर येथे आज (बुधवारी) सायंकाळी घडली.

महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांचा शहरप्रमुख भोसले, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घरोघरी जात प्रचार करत होते. त्याचवेळी तिथे आलेल्या काही जणांनी भोसले यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर हल्ला केला. त्यात भोसले यांच्या हाताला दुखापत झाली आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ता गोरख पाषणकर याचा पाय मोडला आहे. दोघांनाही उपचारासाठी बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Share this: