बातम्या

टू व्हीलर रिपेरिंगसाठी मल्टी ब्रँड आउटलेटचे पुण्यात भव्य उदघाटन

पुणे(वास्तव संघर्ष): स्पीडफोर्स मल्टी ब्रँड टू व्हीलर सर्व्हिस चेन ची नवीन शाखा “ऑटो मार्वल” या नावाने लोहगाव येथे शाखा सुरु झाली.या नवीन शोरूममुळे दुचाकी मालकांना दिलासा मिळाला आहे.दुचाकींची रिपेरिंग व रंगकाम इ.सेवा सुरू झाल्या आहेत या सर्व सेवा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत.

स्पीडफोर्स ही देशातील एकमेव नंबर वन आंतरराष्ट्रीय कंपनी आहे जी सर्व ब्रँडच्या बाइक्सची रिपेरिंग ची सेवा देत आहे. ज्ञानेश्वर घोरमाडे, सुनीता घोरमाडे यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत लोहेगाव येथील नवीन शाखेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पीडफोर्स सर्व्हिस सेंटर मध्ये ग्राहकांना बजाज , हिरो , होंडा , यामाहा , टीव्हीएस या सर्व बाईकसाठी दुरुस्ती सुविधा उपलब्ध आहेत. यासोबतच ब्रेक सर्व्हिस, ब्रेक डाउन, बाईक सर्व्हिस, प्रीमियम बाईक सर्व्हिस, ऑइलिंग, बॅटरी, अपघाती सपोर्ट, क्लेम सेटलमेंट, आणि एएमसी देखील उपलब्ध आहेत.

मार्केटिंग हेड आर.के. भाटिया जी यांनी खूप छान मार्गदर्शन करताना सांगितले की या सेंटर मध्ये ग्राहकांना प्रत्येक ब्रँडच्या बाइकचे सुटे भाग परवडणाऱ्या किमतीत मिळू शकतात त्याच प्रमाणे या ठिकाणी दुचाकीचा विमाही काढता येतो. शोरूममध्ये प्रशिक्षित कर्मचारी आहेत.स्पीडफोर्स कंपनीची स्थापना दीपेन बाराई, कपिल भिंडी आणि अशोक एम. शाह यांनी 2011 मध्ये केली आहे.

या तिघांनाही ऑटोमोबाईल उद्योग आणि विविध क्षेत्रांचा मोठा अनुभव आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्टार्टअप इंडिया धोरणापासून प्रेरणा घेऊन कंपनीचे काम सुरू असून अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध करून देत आहेत. तसेच रोहित राऊत, मनीष गांधी प्रदीप राजपूत यांनी स्पीड फोर्स चे मार्केटिंगचे काम पाहिले. स्पीड फोर्स अंकित “ऑटो मार्वल” सर्व्हिस सेंटर च्या उदघाटन प्रसंगी भावीषा बुद्धदेव ह्या ही उपस्थितीत होत्या तसेच सर्व उपस्थित पाहुणे व तरुणांनी रस्ता सुरक्षेची शपथ घेतली. अशी माहिती ऑटो मार्व्हलचे संचालक प्रतीक घोरमाडे यांनी दिली.

Share this: