क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

मोशीतील गणेश विसर्जनाला गालबोट; चार वर्षीय चिमुकल्याचा टाकीत पडून मृत्यू

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवडमध्ये गणेश विसर्जन मोठ्या उत्साहात झाले. गणपती बाप्पांना गणेश भक्तांनी निरोप दिला. मात्र मोशी येथे गणपती विसर्जन सुरू असताना मोठे गालबोट लागले आणि चार वर्षीय चिमुकल्याचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली.

अर्णव आशिष पाटील असे चार वर्षीय मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.

मोशीतील मंत्रा सोसायटी या ठिकाणी काल सायंकाळी अर्णव हा सोसायटीमधील गणपती विसर्जन टाकीच्या शेजारी उभा राहून बघत होता. लेझीमच्या ठेक्यावर सोसायटीतील सदस्य नाचत असताना अचानक अर्णव हा टाकीत पडला हे कोणाच्याच लक्षात आलं नाही. यासंबंधीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. अर्णव सोबतचा सेल्फी देखील पुढे आला असून तो शेवटचा ठरला.

Share this: