बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पेपर ऍडवान्‍टेजकडून अत्‍याधुनिक एआय उत्‍पादन टेक हब लाँच


पिंपरी(वास्तव संघर्ष) : पेपर ऍडवान्‍टेज या आघाडीच्‍या जागतिक क्रेडिट इंटेलिजन्‍स, क्रेडिट मॅनेजमेंट आणि क्रेडिट इन्‍व्‍हेस्‍टमेंट कंपनीने पुण्यात अत्‍याधुनिक टेक हबचे उद्घाटन केले आहे. हे टेक हब आपल्‍या तंत्रज्ञान विकास प्रयत्‍नांना गती देण्‍यासाठी नाविन्यतेला चालना देण्‍याप्रती तसेच एआयचा वापर करण्‍याप्रती कंपनीच्‍या कटिबद्धतेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. भारतातील ३५ टक्‍क्‍यांहून अधिक वार्षिक दरासह विकसित होत असलेले फिनटेक क्षेत्र २०३० पर्यंत १५.८ लाख कोटी रूपयांपर्यंत पोहोचण्‍याची अपेक्षा आहे. पेपर ऍडवान्‍टेजने या बाजारपेठेत आपले तंत्रज्ञान विकासांचे केंद्र स्‍थापित करण्‍याचा निर्णय घेतला आहे. 


पूर्वी रिओम डॉट एआई म्‍हणून ओळखला जाणारा एआय-संचालित क्रेडिट जोखीम व्‍यवस्‍थापन प्‍लॅटफॉर्म लोनगार्डच्‍या संपादनानंतर पेपर ऍडवान्‍टेज कार्यसंचालनांना केंद्रीकृत करत आपल्‍या जागतिक तंत्रज्ञान विकासामध्‍ये आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. टेक हब विशेषत: लोन ओरिजिनेशन आणि सर्विसिंगदरम्‍यान जोखीम मूल्‍यांकनांसाठी नवीन क्रेडिट तंत्रज्ञान व विश्‍लेषणांना प्रगत करेल. पेपर ऍडवान्‍टेजचे अत्‍याधुनिक तंत्रज्ञान व अल्‍गोरिदम्‍स कर्जदारांना डेटा-संचालित निर्णय घेऊ देणाऱ्या सोल्‍यूशन्‍सची व्‍यापक श्रेणी उपलब्‍ध करून देत युनिफाईड प्‍लॅटफॉर्मसह सक्षम करते. कंपनीच्‍या डेटा व विश्‍लेषण सेवा लोन अंडररायटिंग प्रक्रियेदरम्‍यान फसवे डॉक्‍यूमेंट्स व आर्थिक फसवणूकींशी संबंधित जोखीम मोठ्या प्रमाणात कमी करण्‍यास मदत करतात. ५० संशोधक, प्रोग्रामर्स व ऍनालिस्‍ट्सचा समावेश असलेली डायनॅमिक टीम टेक हबचा मूळ गाभा आहे. हे धोरणात्‍मक हब एआय-संचालित नाविन्‍यतेसाठी पॉवरहाऊस आहे, तसेच पेपर अॅडवान्‍टेजच्‍या तंत्रज्ञान विकासासाठी महत्त्वाचे केंद्र म्‍हणून सेवा देखील देते आणि भारत, इंडोनेशिया, मिडल ईस्‍ट आणि इतर आग्‍नेय आशियाई व युरोपियन बाजारपेठांमधील ग्राहकांना सेवा देणाऱ्या उत्‍पादनांना प्रगत करेल. 


पेपर ऍडवान्‍टेजचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी फ्रेझर गेमेल म्‍हणाले, ”२०२३ मधील आमच्‍या विकासाचे श्रेय ग्राहकांनी आमचे तंत्रज्ञान इनोव्‍हेशन आणि डेटा-संचालित सोल्‍यूशन्‍सना दिलेल्‍या महत्त्वाला जाते. टेक हबच्‍या लाँचसह आमच्‍या परिवर्तनात्‍मक प्रवासाला गती मिळाली आहे, ज्‍यामधून नवीन क्रेडिट तंत्रज्ञान विकसित करण्‍याप्रती आणि भारतातील भरभराट होत असलेल्‍या फिनटेक इकोसिस्‍टममध्‍ये मोठ्या प्रमाणात योगदान देण्‍याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते.” पेपर ऍडवान्‍टेज इंडियाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी मुकुंद कुलकर्णी म्‍हणाले, ”आम्‍हाला भारतात पेपर ऍडवान्‍टेजचे टेक हब असण्‍याचा आनंद होत आहे. लोनगार्डच्‍या संपादनापासून आम्‍ही भारतातील आमच्‍या ग्राहकवर्गामध्‍ये ४० टक्‍क्‍यांनी वाढ केली आहे. तसेच एयूएममध्‍ये २०० टक्‍क्‍यांहून अधिक वाढ झाली आहे. तंत्रज्ञान प्रगती आणि आमच्‍या फिनटेक क्षेत्राच्‍या झपाट्याने होत असलेल्‍या विकासामधून प्रेरित होत भारत लवकरच पेपर ऍडवान्‍टेजसह संपूर्ण विश्‍वासाठी तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धीमत्तेचे जागतिक हब बनेल

Share this: