शरद पवारांनी सरकारला पत्र लिहिले नसते तर मी आज तुमच्या समोर जिवंत नसतो
कन्नड – बेकायदेशीर संपत्ती प्रकरणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी २ वर्ष तुरुंगात काढली. त्यानंतर ते जामिनावर बाहेर आले आहेत .
आपल्या तुरूंगातील आठवणी सांगताना भुजबळ गरिवरुन गेले होते ते आज कन्नडमध्ये राष्ट्रवादीची परिवर्तन यात्रेत संबोधित करताना म्हणाले ‘मला तुरुंगात सव्वा दोन महिने १०२ डिग्री इतका ताप होता. त्यामुळे मी झोपू शकत नव्हतो. मात्र, मला उपचार मिळू दिले जात नव्हते आणि तुरूंगामध्ये व्यवस्थित उपचार केले जात नव्हते. मला उपचार मुद्दाम मिळू दिले नाहीत की, हलगर्जीपणा केला हे सरकारलाच माहीत. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी सरकारला पत्र लिहिले नसते तर मी आज तुमच्या समोर जिवंत नसतो’ असा खळबळ जनक खुलासा भुजबळ यांनी केला. यावेळी भुजबळांनी फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केला.