पिंपरीत निलेश राणे यांच्यावर शिवसैनिकांनी पोलिस ठाण्यात केला गुन्हा दाखल
पिंपरी (वास्तव संघर्ष .) :- माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नीलेश राणे यांनी ‘ठाकरेंची अब्रू रस्त्यावर काढीन आमच्या नादी लागू नका, माझ्या वक्तव्यावर मला वाटले खुप मोठा उद्रेक होईल,शिवसैनिक चवताळून माझ्या अंगावर येतील पण हे साले हिजडे निघाले असे वादग्रस्त विधान केल्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये निलेश राणे यांच्यावर वाकड पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा गुन्हा शिवसेना तिरोडा- विधानसभा संपर्कप्रमुख युवराज दाखले यांनी दाखल केला आहे
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दाखले म्हणतात,माजी खासदार निलेश नारायण राणे यांच्या विरूध्द शिवसेना प्रमुख वंदनिय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल तसेच शिवसैनिकांचा अवमान केल्या बद्दल वाकड पोलिस स्टेशन मध्ये कलम १५५ फौजदारी दंड सहीत भा. द. वी कलम ५०० प्रमाणे गुन्हा दाखल केला असून लवकरच निलेश राणे यांनी शिवसेनेची जाहीर माफी मागावी अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ .
यावेळी शिवशाही व्यापारी संघ प्रदेश सचिव गणेश आहेर,गोरख पाटील,नवनाथ जाधव,रविकिरण घटकार,बाळासाहेब गायकवाड,मारूती मस्के,रोहीदास तांबे,दत्ता गिरी,गणेश पाडुळे,आशिष वाळके,भाग्यश्रीताई मस्के ,सारीकाताई ताम्हचिकर सुनिताताई खंडाळकर,विशाल बाविस्कर,दिपक कांबळे,प्रदिप दळवी,आदी शिवशाही व्यापारीसंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.