बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

शहरात राज्यस्तरीय दर्जाचे ” लहुजी वस्ताद क्रिडा भवन” उभारण्यासाठी महापौरांना निवेदन 

भाजप निगडी अध्यक्ष किशोर हातागळे यांची आयुक्त व क्रिडा सभापतींकडे मागणी

पिंपरी दि. ०१ (वास्तव संघर्ष )- पिंपरी चिंचवड शहरातील उत्कृष्ट खेळाडु व विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी शहरात मैदानी खेळाचे राज्यस्तरीय दर्जाचे क्रिडा भवन उभारावे अशी मागणी भाजप निगडी अध्यक्ष किशोर हातागळे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर व क्रिडा समितीकडे केली आहे.तसेच शहरात राज्यस्तरीय दर्जाचे ” लहुजी वस्ताद क्रिडा भवन” उभारण्यासाठी पिंपरी -चिंचवड निवेदन राहूल जाधव यांनाही निवेदन देण्यात आले.

हातागळे यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हणले आहे की, “पिंपरी चिंचवड शहर औद्योगिक नगरी असुन शहर आता स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत आहे, आपल्या शहराच्या शैक्षणिक गुणवत्तेतही चांगल्या प्रकारे वाढ होत आहे परंतु शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्राकडेही लक्ष देण्याची गरज आहे, शहरातील बरेच विद्यार्थी वेगवेगळ्या खेळात पारांगत आहेत, राज्यस्तरीय व आंतरराष्ट्रीय क्रिडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करून शहराचे नाव चांगल्याप्रकारे गाजवु शकतात व काहीजण चांगला प्रयत्नही करत आहेत पण त्यांना हवेतसे मार्गदर्शन लाभत नाही कारण आपल्या शहरात उत्कृष्ट क्रिडा भवन अस्तित्वातच नाही, शाळेतील विद्यार्थी फक्त शाळेसाठी खेळतात पण त्यांचा पुढील विकास होताना दिसत नाही, खुप कमी प्रमाणात खेळाडु व विद्यार्थी महापालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या क्रिडा विभागाच्या योजनेचा लाभ घेतात यावरुन शहरातील खेळाडुंची प्रगती लक्षात येते.

शहरात नुकतेच “मुख्यमंत्री करंडक” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यात शहरातील हजारो खेळाडुंनी उस्फुर्त सहभाग घेतला होता यावरुनच याविषयाचे गांभीर्य लक्षात येईल व हे राज्यस्तरीय क्रिडा भवन होणे किती गरजेचे आहे याचा आपल्याला अंदाज येऊ शकेल.

शहरात सुसज्ज असे राज्यस्तरीय दर्जाचे क्रिडा भवन उभारावे त्यात विद्यार्थी, महिला व पुरुषांना मैदानी खेळासोबत विविध शारीरिक खेळाचे प्रशिक्षण मोफत देण्यात यावे, सर्व शाळा व महाविद्यालयातील सर्वोत्कृष्ट खेळाडुंची निवड करण्यात आल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना या क्रिडा भवनात प्रवेश मिळावा व त्या खेळाडुंना उत्तमरीत्या योग्य त्या-त्या खेळातील यशस्वी प्रशिक्षकाद्वारे प्रशिक्षण मिळावे सर्व खेळाडुंची गुणवत्ता व दर्जा वाढण्यासाठी विविध राज्यस्तरीय व आंतरराष्ट्रीय खेळांच्या स्पर्धेत आपले खेळाडु पुर्ण ताकदीने खेळतील यासाठी सर्व खर्च महापालिकेने करावा त्यामुळे शहरातील हजारो कर्तृत्ववान खेळाडु घडतील व राज्यस्तरीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत शहराचं व देशाचं प्रतिनिधित्व करतील तसेच शहरातील जेष्ठ नागरिकांनाही आरोग्याच्या बाबतीत मैदानी खेळाची आवश्यकता आहेच, प्रत्येक उद्यानात जेष्ठ नागरिक मोठया प्रमाणात शारीरिक कसरती व व्यायाम करताना दिसतात परंतु क्रिडा भवनातुन जर त्यांना आवड असणाऱ्या खेळाचा सराव करता आला तर त्यांचे आयुष्यमान अजुनच वाढेल ही महत्वाची गोष्ट आहे

मैदानी व शारीरिक खेळात प्रामुख्याने तलवारबाजी, कुस्ती, कबड्डी, खो-खो, भालाफेक, गोळाफेक, मल्लखांब, नेमबाजी, गिर्यारोहण, नेमबाजी, लाठी, स्केटिंग, सायकल शर्यत, अश्वारोहन, विविध कसरती, व्यायामी व मैदाने खेळ, वेटलिफ्टिंग, कराटे, बॉक्सिंग, बास्केटबॉल अशा विविध खेळांचा समावेश करून त्यासाठी अनुभवी प्रशिक्षकांची नेमणुक त्यात करावी.

शहरातील क्रिडाप्रेमी युवक युवतींची व विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे, सध्याच्या युगात मुले सोशल मीडियाच्या जाळ्यात गुंतत चालली असुन त्याचा शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासावर विपरीत परिणाम होत आहे त्यामुळे सर्वांना मैदानी खेळाची आवड निर्माण होणे गरजेचे आहे तरच आजची पिढी शारीरिकदृष्ट्या सक्षम व निरोगी होईल.

आद्यक्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे हे थोर समाजसुधारक होते त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात कित्येक शुरवीरांना मैदानी खेळातुन घडविले, तलवारबाजी, नेमबाजी, शारीरिक कसरतीचे प्रशिक्षण देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवुन देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे, पिंपरी चिंचवड शहरात त्यांच्या कार्याला प्रेरणादायी असणारे मैदानी व शारीरिक खेळाचे उत्कृष्ट प्रशिक्षण केंद्र म्हणजेच क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे राज्यस्तरीय क्रिडा भवन उभारण्यात आले तर शहराबरोबर जिल्ह्यातील उत्कृष्ट खेळाडु चांगल्या प्रकारे घडतील व शहराच्या नावलौकिकात अजुन चांगली भर पडेल याची आपण गांभीर्याने दखल घ्यावी, असे त्यात म्हणले आहे.

Share this: