बातम्यामहाराष्ट्र

हे वर्ष शिवसेनेचे असून आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे १५० ते १७५ आमदार असतील – आदित्य ठाकरे

पुणे(वास्तव संघर्ष) पुणे येथील विकास कामाचे उद्घाटनासाठी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आले असता ते जनतेला संबोधित करताना म्हणाले, आगामी वर्ष हे शिवसेनेचे वर्ष असणार असून युती होईल किंवा नाही हे सांगू शकत नाही.

पण येणा-या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे किमान १५० ते १७५ आमदार असतील, असा विश्वास युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. पुण्यातील आंबेगाव खुर्द-जांभुळवाडी येथील विविध विकास कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी आदित्य ठाकरे बोलत होते. मतदान जिथे करायचे असेल तिथे करा, पण आमच्या मागे तुमचे आशिर्वाद कायम असू द्या, असे आवाहन देखील त्यांनी केले.

यावेळी स्थानिक आमदार आणि जलसंधारण मंत्री विजय शिवतारे, आमदार नीलम गोऱ्हे, भाजपाचे आमदार भीमराव तापकीर, शिवसेना शहरप्रमुख चंद्रकांत मोकाटे, शिवसेना नेते महादेव बाबर, नगरसेविका संगीता ठोसर तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

Share this: