बातम्यामहाराष्ट्र

मुलं मुलींकडे बघणार नाहीत तर काय मुलांकडे बघणार- उदयनराजे भोसले

सातारा-येथील कोरेगाव मधील ‘डी. पी. भोसले महाविद्यालया’मध्ये  (शुक्रवारी ) उदयनराजे भोसले लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराठी विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते . यावेळी एका विद्यार्थिनीने ‘मुलं छेड काढतात’ अशी तक्रारच त्यांच्याकडे दुर्लक्ष वलकेली. ‘मुलं पाठलाग करतात, मागे येऊन ओव्हरटेक करतात, मुली स्टँडवर थांबल्या की, गाडी जवळच उभी करुन त्यांच्याजवळ उभी राहतात, त्यांना सारखं बघतात’ असं गाऱ्हाणं उदयनराजेंसमोर मांडलं. परंतु यावर उदयनराजेंनी दिलेल्या उत्तरामुळे सर्वच अवाक झाले.

मुलीचं गाऱ्हानं एकल्यानंतर उदयनराजे म्हणाले की, ‘मी काय उत्तर देऊ मलाच कळत नाही. मात्र ही गोष्ट नॅचरल आहे. तुम्हाला थोडा त्रास होईल, पण मुलं मुलींकडे बघणार नाहीत, तर काय मुलांकडे बघणार का?’ असा प्रतिप्रश्न उदयनराजेंनी तक्रारदार विद्यार्थिनीला विचारला. त्यानंतर उदयनराजे म्हणाले, ‘याचा अर्थ असा नाही की कोणत्याही प्रकारची विकृती त्यांच्यात असली पाहिजे. ती विकृती जर असली तर आपण मला येऊन सांगा. आपण जातीने त्याच्यात लक्ष घालू, संबंधित व्यक्तीला समजून सांगण्याचं काम करु’.

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी विद्यार्थांशी संपर्क साधून मताधिक्य वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यासाठी उदयनराजे महाविद्यालयांमध्ये जाऊन नवमतदारांशी बातचित करत आहेत

Share this: