वास्तव संघर्षच्या बातमीचा दणका …! अखेर हिंजवडी भागात स्मशानभूमिचे काम युद्धपातळीवर सुरू
पिंपरी-( वास्तव संघर्ष ) – मृतदेह जाळायला हिंजवडी सारख्या विकसित भागात स्मशानभूमीच नाही. स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध होऊनही गेल्या १० वर्षांत प्रशासनाला येथे स्मशान उभारता आलेले नव्हते . त्यामुळे रस्त्यावरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ हिंजवडीतील रहिवाशांवर आली होती. हिंजवडी हा परिसर आयटी कंपन्यांनी गजबजलेला असूनही या भागात स्मशान नाही.साधारत: मेगापॉलिस सर्कल येथे २५०० नागरिक स्थायिक आहेत व गवारेवाडी येथे ५०० लोकांची लोकवस्ती आहे.येथे कोणी मरण पावला तर त्याचा मृतदेह भररत्यावरच जाळण्यात येतो.
परमेश्वर बाळासाहेब गवारे (वय 32,रा. गवारेवाडी, माण) या तरुणाचे अल्पशा आजाराने निधन झाले होते.मात्र, अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी उपलब्ध नसल्याने माणगाव किंवा भोईरवाडीची स्माशाभूमी येथे जाऊन अंत्यसंस्कार करावे लागत होते. हिंजवडीपासून माण ५किलोमीटर अंतरावर आहे. तर भोईरवाडीची स्मशानभूमी ४ किलोमीटर लांब आहे. इतक्या लांब जाणे शक्य नसल्याने हिंजवडीत भर रस्त्यातच अंत्यसंस्कार करण्यात आला होता .
सदर बातमी वास्तव संघर्ष च्या फेसबुकच्याऑनलाइन पेज वरून दि. ७ जुलै २०१७ या दिवशी दिली होती..या बातमीची दखल घेत महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने सहा गुंठे जागा स्माशाभूमीसाठी माण ग्रामपंचायतला सुपुर्द केली आहे. त्या जागेवर साफसफाई करून स्माशाभूमी बनवण्याचे काम चालू झाले आहे…त्यामुळे स्थानिकांचा विजय झाला आहे..मैत्री चळवळ यांनी आम्हाला दिलेल्या माहीतीच्या आधारे आम्ही याचा पाठपुरवठा केला..मैत्री चळवळीचे अजय लोढ़े यांनी आनंद व्यक्त करत वास्तव संघर्ष चे आभार मांडले आहे.. गवारेवाडीसाठी स्वतंत्र स्मशानभूमीची आता सोय होणार आहे.
आतापर्यंत ४० ते ५० जणांवर रस्त्यावरच अशाच प्रकारे अंत्यसंस्कार केल्याची माहिती असून, प्रशासनाचे मात्र याकडे स्पष्टपणे दूर्लक्ष केले होते.