बातम्यामहाराष्ट्र

जालना :वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन 

जालना (प्रतिनिधी:धामणा धरणाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करुन नागरीकांचा जिव धोक्यात घालणार्‍या अधिकार्‍यावर गुन्हे दाखल करुन त्यांना तात्काळ निलंबीत करण्यात यावे या व अन्य मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी आणि भारिप बहुजन महासंघाच्या वतीने दि. 8 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

धामधा धरणाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, जिल्ह्यातील सर्वच धरणे आणि लघू मध्यम, प्रकल्पाची दुरुस्ती करण्यात यावी, धामणा धरणग्रस्तांहस धरणाखाली धोका असणार्‍या कुटूंबाचे तात्काळ पुणर्वसन करण्यात यावे, पिक विमा कंपनीकडून वाटप करण्यात आलेले पिक विम्याचे अर्ज न वाटता खाजगी सोसायटी मार्फत पिक विम्याचे अर्ज विक्री करणार्‍यांवर तात्काळ कारवाई करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत,

जिल्हाधिकारी तसेच सरकारची आणि पिक विमा कंपनीची परवानगी न घेता खाजगी पिक विमा अर्ज छापून त्याची शेतकर्‍यांना विक्री करणार्‍यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत, सीएससीच्या जिल्हा समन्वयकांनी आणि बजाज कंपनीच्या जिल्हा समन्वयकांनी मिळून पिक विमा अर्ज विक्री करण्यात आल्याने त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी. किसान योजना व दुष्काळी अनुदान वाटप करण्यास टाळाटाळ करणार्‍या बँकांवर कारवाई करुन अनुदान तात्काळ वाटप करण्याचे आदेश देण्यात यावेत, नवीन पिक कर्ज वाटप करुन थकित कर्जदारांनाही पिक कर्जाचे वाटप करण्यात यावे, कंडारी ता, घनसांवगी येथील गायरान धारकांना जमीनी नियमाकुल करुन सातबारा नावावर करण्यात याव्यात, महिला बचत गटांना वाटप करण्यात आलेले कर्ज माफ करण्यात यावे, कामगार कार्यालयात कामगारांची होणारी पिळवणूक थांबवून दलाल मुक्त कार्यालय करण्यात यावे, विविध महामंडळाचे कर्ज तात्काळ माफ करण्यात यावे यासह अनेक मागन्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आल्या आहेत. या आंदोलनात भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिपक डोके, चोखाजी सौंदर्य, गौतम खंडागळे, अकबर इनामदार, अ‍ॅड. कैलास रत्नपारखे, दिपक घोरपडे, विष्णू खरात, शफीक आतार, विजय लहाने, शहराध्यक्ष कैलास रत्नपारखे, परमेश्वर खरात, देवीदास कोळे, प्रदिप जोगदंड,  विनोद दांडगे, शिवाजी दाभाडे, बबन जाधव, गौतम वाघमारे, गौतम वाघमारे, ज्ञानेश्वर जाधव, खाजा खान, अर्जुन जाधव, अनिल झोटे, बाळासाहेब जाधव, नितीन लालझरे, कैलास बनसोडे, लक्ष्मण कोळे, बंटी इंगळे, मिनाबाई वाहुळे, मैनाबाई खंडागळे, मथूराबाई मोरे, कमलबाई जोगदंड, विमलबाई गायकवाड, वत्सलाबाई अंबडकर, सुभाष येटाळे, सचिन वाघमारे, दिपक रत्नपारखे, पद्माकर बोर्डे, जमीरोद्दीन बागवान, कैलास जाधव, संतोष मगर, सिध्दार्थ कनकुटे, लखन चित्तेकर, किरण गंगातिवरे, सुरेष वाहुळे, नकीम सय्यद, सुभाष पाईकराव, शिवानंद तांबे, भगवान मघाडे, बबन खाडे, प्रकाश बनसोडे, छबूराव आधूडे, राहुल खरात, वैभव वानखेडे, प्रविण काळे, विक्की रत्नपारखे, श्रीमंत पाईकराव, सुनिल गोंडगे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आंदोलनात उपस्थित होते.

Share this: