क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरीतील हितेश मुलचंदानी खून प्रकरण;अजून एका आरोपीस अटक

पिंपरी(वास्तव संघर्ष) हितेश मुलचंदानी खून प्रकरणी आणखी एका आरोपीला खंडणी दरोडा विरोधी पथकाने दापोडी येथून अटक केली तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. अरबाज मुन्ना शेख वय वीस खडकी बाजार पुणे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

अक्षय संजय भोसले उर्फ लिंगा (वय 25 ),  योगेश विठ्ठल टोपणे उर्फ लंगडा (वय 20), फिरोज खान मोमीन  यांना यापूर्वी अटक केली आहे मित्रांचे पिंपरी येथील कुणाल हॉटेलमध्ये बिला वरून वाद झाले किरकोळ वादाचे रूपांतर भांडणात झाले हॉटेलमध्ये भांडण सुरू असल्याबाबत हितेश ला त्याच्या मित्राचा फोन आला हितेशने त्याच्या काही मित्रांसोबत कुणाल हॉटेल गाठले हॉटेलमध्ये भांडणे सोडवत असताना चार जणांनी हितेशला जबरदस्तीने मोटारीत बसले चौघांनी हितेशला पिंपरी चिंचवड महानगरपालिका इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या रस्त्यावर आणले तेथे त्याच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याचा गळा चिरला यामध्ये गंभीर जखमी झालेल्या हितेश चा मृत्यू झाला.

याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी घटनेच्या दिवशी एकाला ताब्यात घेतले त्यानंतर पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने औंध येथे आणखी दोघांना अटक केली त्यानंतर खंडणी दरोडा विरोधी पथकाने चौथ्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील ,यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत ,पोलीस उपनिरीक्षक अनिकेत हिवरकर, पोलीस कर्मचारी अजय भोसले ,महेश खांडे, किरण काटकर, उमेश पुलगम, नितीन लोखंडे व सागर शेळके यांच्या पथकाने केली.

Share this: