बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरीतील संजय गांधीनगर व रिव्हर रोड येथील पुरग्रस्तांना अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या वतीने अल्पोपहार वाटप

पिंपरी (वास्तव संघर्ष ) प्रतिनिधी – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या वतीने पिंपरी येथील पुरग्रस्तांना अल्पोपहार वाटप करण्यात येऊन त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या यावेळी समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.सध्या राज्यात मुसळधार पावसामुळे पिंपरी चिंचवड शहरातही पुरस्थिती निर्माण झाली असुन दापोडी, कासारवाडी, पिंपरी, चिंचवड यासह नदीकाठची अनेक घरे पाण्याखाली गेली असुन भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे,.

याचीच दखल व सामाजिक बांधिलकी जपत मातंग समाजाच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या वतीने पिंपरीतील स्व.संजय गांधीनगर व रिव्हर रोड येथील पुरग्रस्तांना अल्पोपहार वाटप करण्यात आला यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे संचालक मनोज तोरडमल, महोत्सव समितीचे अध्यक्ष सतीश भवाळ, कार्याध्यक्ष अण्णासाहेब कसबे, सचिव संजय ससाणे यांच्या शुभहस्ते वाटप करण्यात आले, त्यानंतर तेथील समस्या जाणुन घेऊन महापौर राहुल जाधव यांची भेट घेऊन त्यांना तेथील समस्याची माहिती देत लवकरच पुरग्रस्तांच्या समस्या सोडविण्याची मागणी केली.यावेळी हनुमंतनाना कसबे, भगवान शिंदे, अरुण जोगदंड, नितीन घोलप, शिवाजी साळवे, किशोर हातागळे, भिमा वाघमारे, गणेश साठे, सचिन वाघमारे, दिपक खंडाळे, बाळासाहेब गालफाडे, मुकुंद गायकवाड, सुरेश पाटोळे, आदिकेत वाघमारे, संजय येवलेकर, विकास भवाळ, ऋषिकेश कसबे, सत्यवान रोकडे हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Share this: