बातम्यामहाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

पूरग्रस्त व्यापाऱ्यांचा जीएसटी कर रद्द करा; युवराज दाखले यांची मुख्यमंञ्याकडे मागणी

पिंपरी(वास्तव संघर्ष) :सांगली, कोल्हापूर आणि पुण्यासह महाराष्ट्रामधील नद्यांच्या पुरामुळे स्थानिक व्यापाऱ्यांचे भरपूर प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे राज्यातील पूरग्रस्त भागातील व्यापाऱ्यांचा या वर्षीचा जीएसटी कर रद्द करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना प्रणित शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे कोल्हापूर,सांगली, कराड, कोकण, ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापुर, नाशिक, वसई, विरार आणि पालघर या ठिकाणी भयंकर पुरस्थिती निर्माण झाली होती. या पुरामुळे हजारो घरे, दुकाने, कार्यालये, गोदामे आणि कारखाने यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या नैसर्गिक आपत्तीत अडकलेल्या हजारो दुकानदार व व्यापाऱ्यांच्या मालाचे नुकसान झाले आहे. त्यांना पुन्हा नव्याने व्यवसायाची सुरूवात करावी लागणार आहे. या पुरग्रस्तातील व्यवसायिकांना व व्यापाऱ्यांना राज्य सरकारची व केंद्र शासनाच्या मदतीची अत्यंत आवश्यकता आहे. या संकटाची गंभीरपणे दखल घेऊन न्याय द्यावा, पूरग्रस्त भागातील व्यापाऱ्यांचा या वर्षीचा जीएसटी कर रद्द करण्यात यावा अशी मागणी शिवशाही व्यापारी संघाच्या सर्व जिल्ह्याध्यक्षाच्या वतीने युवराज दाखले यांनी केली आहे

Share this: