क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरीतील शिवसेनेचे उमेदवार गौतम चाबुकस्वार आणि नगरसेवक प्रमोद कुटे यांच्यावर गुन्हा दाखल

पिंपरी (वास्तव संघर्ष) निवडणूक आयोग किंवा पोलिसांनी पूर्व परवानगी न घेता आकुर्डी परिसरात पदयात्रा काढली. या प्रकरणी शिवसेनेचे उमेदवार ऍड. गौतम चाबुकस्वार आणि नगरसेवक प्रमोद कुटे यांच्या विरोधात आचार संहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने कोणताही कार्यक्रम घेताना पूर्वपरवानगीची आवश्‍यकता असते.

उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनाही सदरची बाब बंधनकारक असते. गुरुवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास शिवसेनेचे उमेदवार ऍड. गौतम चाबुकस्वार आणि नगरसेवक प्रमोद कुटे यांनी आकुर्डी परिसरात पदयात्रा काढण्याची तयारी केली. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना नोटीस देत पूर्व परवानगीशिवाय पदयात्रा काढू नये, अशी सूचना केली.

मात्र पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करीत ऍड. चाबुकस्वार आणि प्रमोद कुटे यांनी तब्बल अडीच तास पदयात्रा काढली. यामुळे त्यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक संदीप शहाजी ओहोळ यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. उपनिरीक्षक रघुनंदन भोये याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Share this: