बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

वंचीतचे उमेदवार बाळासाहेब गायकवाड यांना शिंदेशाहीचा पाठिंबा ;भोसरीत अमोल कोल्हे तर पिंपरीत उत्कर्ष शिंदे पॅटर्न यशस्वी ठरणार

दिपक साबळे…! पिंपरी (वास्तव संघर्ष) राज्यात सध्या खमंग चर्चा आहे ती वंचित बहुजन आघाडीचे पिंपरी विधानसभाचे उमेदवार प्रवीण उर्फ बाळासाहेब गायकवाड यांच्या नावाची. कारण शिंदेशाहीचे डॉ उत्कर्ष आनंद शिंदे यांची पिंपरीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रथम प्रचार रॅलीत एन्ट्री झाली.

लोकसभा निवडणूकीला खासदार डॉ. अमोल कोल्हे  पॅटर्न यशस्वी झाल्यानंतर तोच सेलिब्रिटी पॅटर्न पिंपरीत यशस्वी होणार आहे. संध्या पिंपरीचा गडावर शिवसेनेचे आमदार आहेत. या मतदारसंघातही पहिले आमदार राष्ट्रवादीचे होते. हा गड पून्हा ताब्यात मिळवण्यासाठी वंचीतने चांगलीच कंबर कसली आहे.

सलग तीन टर्म खासदार आणि मतदारसंघावर मजबूत पकड, दाडंगा जनसंपर्क असलेले शिवाजी आढळराव पाटील यांचा डाॅ. अमोल कोल्हे यांच्याकडून पराभव झाला. त्याच धर्तीवर पिंपरीतही शिंदेशाही अवतरणार आहे. गायक आनंद शिंदेचे सुपूत्र डॉ. उत्कर्ष शिंदे यांनी  पिंपरीतून वंचीत बहुजन आघाडी चे अधिकृत उमेदवार प्रवीण उर्फ बाळासाहेब गायकवाड यांना पाठिंबा दिला आहे.

वास्तव संघर्ष प्रतिनिधींनी यासंदर्भात उत्कर्ष शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, अवघा महाराष्ट्र प्रस्थापित पक्षांच्या विरोधात आहे, अॅड बाळासाहेब आंबेडकर यांचा पहिल्यापासून हा विरोध होता प्रस्थापित राजकीय पक्षांनी निवडणुकांना सामोरे जाताना पैशाने श्रीमंताना उमेदवारी दिली आहे माञ ज्यांना कोणी ओळखत देखील नाही अशा गरीब उमेदवारांना बाळासाहेबांनी उमेदवारी घोषीत केली ख-या अर्थाने त्यांनी वंचीताना विधानसभेत जाण्याची संधी दिली आहे.

पुढे ते म्हणाले की शिंदेशाहीवर ब्राह्मणसह मराठा देखील प्रेम करत आहेत याचा फायदा नक्कीच वंचीतला करून देईल. महाराष्ट्राच्या प्रमुख मतदारसंघात माझ्यासह सुजात आंबेडकर, अंजलीताई आंबेडकर यांच्यावर प्रचाराची जबाबदारी बाळासाहेबांनी दिली आहे. निश्चितच शिंदेशाही घराणे म्हणून मी ही जवाबदारी पार पाडेन.


दरम्यान,औरंगाबाद, नांदेड, अकोला, नागपूर सोलापूर कोल्हापूर याठिकाणी उत्कर्ष आनंद शिंदे यांची प्रचारात प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

Share this: