बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या विजयासाठी जगताप मैदानात ;काळेवाडी प्रभागातील शेकडो महिलांचा कार्यक्रमाला हजेरी

पिंपरी ( प्रतिनिधी) – अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या विजयासाठी काळेवाडीतील सामाजिक कार्यकर्ते बाबसाहेब जगताप हे देखील आता मैदानात उतरले आहेत. चिंचवड मतदारसंघातील जनतेने आता डोळसपणे मतदान करण्याची वेळ आली असून मतदारसंघाचा खरा विकास फक्त राहुल कलाटे यांच्यासारखा दमदार युवा नेताच करू शकतो. फसवे दावे करणाऱ्या लोकांना आता घरी बसवा. कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन जगताप यांनी केले आहे.

काळेवाडी येथे राहुल कलाटे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत जगताप बोलत होते. बैठकीला कलाटे यांच्या पत्नी वृषाली कलाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नारीशक्ती महिला मंडळाच्या रेश्मा कदम, चित्रा जगताप, अर्चना कदम यांच्यासह काळेवाडी प्रभागातील शेकडो महिलांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती.यावेळी बोलताना जगताप म्हणाले की, ही निवडणूक फक्त राहुल कलाटे यांची नसून ही सर्व काळेवाडीकरांची निवडणूक आहे. गेल्या अनेक वर्षात काळेवाडीची भकासनगरी होत असताना कोणत्याही आमदारांनी काळेवाडीच्या विकासासाठी प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे किमान यापुढे तरी काळेवाडीचा विकास करायचा असेल तर सुशिक्षित आणि दमदार उमेदवार असलेल्या राहुल कलाटे यांना आपण एक संधी देण्याची गरज असून त्यासाठी आपण सर्वांनी मिळून कलाटे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Share this: