पिंपरी चिंचवड : पती निघाला नपुसंक म्हणून पत्नीने घेतली पोलीस ठाण्यात धाव
पिंपरी (वास्तव संघर्ष ) :- पिंपरी पोलीस स्टेशनमधे एक आगळा-वेगळाच गुन्हा दाखल झाला आहे. एका पंचविस वर्षीय तरूणीने आपल्या पती आणि सासरच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे यात तरूणीने आपला पती नपुसंक आहे लग्नानंतर त्याने आपल्याला कसलेही सुख न देता तो नपुंसक असल्याची माहिती सासरच्यांनीही लपवून ठेवत आपली फसवणूक केली. याप्रकरणी विवाहितेने पोलीस ठाण्यात फसवणूक व विवाहितेच्या छळाची फिर्याद दिली आहे.
याबाबत २५ वर्षीय विवाहितेने शुक्रवारी (दि. ६) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती, सासू, सासरे आणि नणंद यांच्या विरोधात विवाहितेचा छळ आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ५ फेब्रुवारी २०१८ ते २२ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत पिंपरी आणि वडगावशेरी, पुणे येथे घडली. पती नपुसंक असल्याची माहिती सासरकडील मंडळींनी लपवून ठेवली. लग्न झाल्यापासून आपल्याला वैवाहिक सुखापासून पतीने वंचित ठेवले. एवढेच नाही तर पतीने इतरांशी असलेल्या शारिरीक संबंधाचे फोटो आणि व्हिडिओ क्लीप आपल्याला पाठविली. तसेच सासरकडील मंडळींनी फिर्यादीला पाच लाख रुपयांची मागणी केली. लग्नात मानपान केला नाही म्हणून तिचा शाररीक व मानसिक छळ केला. तसेच नांदविण्यास नकार दिल्याने विवाहितेला तिच्या आई-वडिलांकडे सोडून दिले. याबाबत अधिक तपास उपनिरीक्षक ज्ञानोबा निकम करीत आहेत