संपादकीय

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला महापुरूषांचा विसर ;शासकीय परिपञक निघून देखील अंमलबजावणी नाहीच

दिपक साबळे…! पिंपरी(वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. मात्र पालिकेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या दालनात देव,देवतांच्या प्रतिमाच नव्हे, तर मुर्त्या आणि देव्हारेसुद्धा आहेत. यात दस्तुरखुद्द पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर आणि अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील याचे दालनसुध्दा येते. प्रशासकीय पद मोठे असल्याने आयुक्त कार्यालयात महापुरूषांचा फोटो असला पाहिजे होता माञ एकही महापुरूषांचा फोटो नसल्याने आयुक्त कार्यालय शासकीय नव्हे प्रायव्हेट आॅफिस वाटतं आहे.

आपल्या देशाच्या संविधानानुसार आपला देश हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. त्यानुसार आपल्याला धर्मस्वातंत्र्याचा अधिकार जरूर आहे.माञ त्याला काही मर्यादा आहेत. आपण आपल्या धर्माचं आचरण चार भिंतींच्या आत करू शकतो, परंतु ज्यावेळेस आपण घराबाहेर सार्वजनिक क्षेत्रात येतो तेव्हा आपण फक्त भारतीय नागरिक आणि संविधानाचे पाईक असतो. शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालये तसेच इतर कोणत्याही शासकीय संस्थांमध्ये कोणत्याही धर्माचे शिक्षण, सण, उत्सव, करू शकत नाही. त्या ठिकाणी धर्मनिरपेक्ष पद्धतीनेच राज्यकारभार चालवला पाहिजे, असे संविधान सांगते.

राज्यशासनाचे परिपञक माञ पालिकेला महापुरूषांचा विसर..!

राज्यशासनाने परिपत्रक काढून सर्व शासकीय कार्यालयातील सर्व धर्मांच्या देवदेवतांचे फोटो काढून टाकण्याचे आदेश दिलेले आहेत.तसेच महापुरूषांच्या प्रतिमा लावण्याचे आदेश दिले आहेत माञ त्याची अंमलबजावणी झालेली नाही. उलटपक्षी महापुरूषांच्या विसरच पडलेला दिसून येत आहे.

पालिकेतील वरील फोटोत स्पष्ट दिसते की कार्यालयात महापुरूषांचे फोटो नाहीत..!

शिक्षण मंडळात देवी आहे. स्थायी समिती अध्यक्षांच्या दालनातही देव आहे.महापौर कक्षात देव आहे, इतरही अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या दालनात देव, देवतांच्या प्रतिमाच नव्हे,तर मुर्त्या आणि चक्क देव्हारेही आहेत. मात्र महापुरूषांचा फोटो नाही. जेव्हा इतर धर्मीय लोक या पदाधिकारी व अधिकाऱ्यांकडे येतात तेव्हा त्यांचा संबंधितांकडे पाहण्याचा दृष्टिकोन संकुचित होतो. तेथे जातीयभावना निर्माण होते.

दरम्यान, पिंपरी चिंचवड मनपाचे उपमहापौर कार्यालय, विधी समिती कार्यालय, महिला बालकल्याण, शहर सुधारणा शिक्षण येथे महापुरुषाच्या प्रतिमा लावलेल्या दिसतात.

Share this: