बातम्या

पिंपरीतील भिमसृष्टी प्रकल्पात मनुस्मृती दहन शिल्प वगळल्याने मनपाच्या निषेधार्थ आंदोलन

पिंपरी(वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी,भिमसृष्टी प्रकल्पात मनुस्मृती दहन क्रांतीकारक ऐतिहासिक प्रसंग शिल्प वगळल्याने मनपाचा निषेध करण्यासाठी भिमसृष्टी, पिंपरी याठिकाणी निदर्शने आंदोलन करण्यात आले.

या दरम्यान उपस्थित महिलांच्या हस्ते मनुस्मतीचे सार्वजनिक दहन करण्यात आले. या आंदोलनात नागरी हक्क सुरक्षा समिती, सम्यक विद्यार्थी आंदोलन,रयत विद्यार्थी विचार मंच, सावित्रीबाई फुले स्मारक समिती, ओबीसी संघर्ष समिती, संभाजी ब्रिगेड, बौद्ध समाज विकास महासंघ, संविधान जनजागृती अभियान समिती, अपना वतन, एम.आय.एम. पक्ष, समाजवादी पार्टी या संघटना व पक्ष यांनी सहभाग घेतला.

यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने भिमसृष्टी प्रकल्पात मनुस्मृती दहन प्रसंग शिल्प वगळल्याने त्या विरोधात निदर्शने करून निषेध व्यक्त करण्यात . आला.आंदोलनाचे
नेतृत्व जेष्ठ विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनी केले.

मनपाचा निषेध करताना कांबळे म्हणाले की, महानगरपालिकेने तात्काळ या शिल्पाचा समावेश भिमसृष्टी करावा अन्यथा यापेक्षा अधिक तीव्र जनआंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला. माजी नगरसेवक मारूती भापकर यांनी महापालिकेला या बाबतचे निवेदन देऊन पत्रव्यवहार व पाठपुरावा करून देखील अद्याप कुठलीच कार्यवाही केली नसल्याने खेद व्यक्त केला. यावेळी संतोष जोगदंड, रफिक कुरेशी,प्रदिप पवार,धम्मराज साळवे, संतोष शिंदे, सुरेश गायकवाड, दिलीप रणपिसे, यांनी निषेधपर मनोगत व्यक्त केले.यावेळी नगरसदस्या सुलक्षणा धर-शिलवंत, गंगाताई धेंडे, अंजना गायकवाड, अकिल मुजावर,आनंदा कुंदळे, सतिश काळे, नकुल भोईर, विष्णु मांजरे, विजय जगताप, सुनिल कांबळे, विजय गायकवाड, अॅड. लक्ष्मण रानवडे, उपस्थित होते.आंदोलनाचे प्रास्ताविक गिरीष वाघमारे यांनी केले तर आभार सिद्दीक शेख यांनी व्यक्त केले.

Share this: