ओबीसी बांधवांनी स्विकारला बुध्द धम्म; धर्म, जात बदलत धारण केले बुध्दिस्ट नाव
वास्तव संघर्ष आॅनलाईन, नागपूर :- वर्धा मार्गावर उर्वेला कॉलनी येथील बानाई सभागृहात धम्मदीक्षा समारंभ झाला या समारंभात शंभर ते दीडशे ओबीसी बांधवांनी आपला पुर्वीचा धर्म जात आणि नाव त्यागून नवीन धम्म स्विकारला आहे यावेळी त्यांनी त्रिशरण पंचशील २२ प्रतीज्ञा घेत बुधवारी धम्मदीक्षा घेतली.
यावेळी मोठया संख्येने धम्मबांधवांतर्फे संविधान चौकातून धम्म रॅली काढण्यात आली. समारंभात अनेक राज्यातील धम्मबांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते.२५ डिसेंबर हा आज मनुस्मृती दहन दिन या पार्श्वभूमिवर ओबीसी बांधवांनी हिंदू धर्माचा त्याग करून धम्मदीक्षा घेतली.
ओबीसी धम्मबांधव, सार्वजनिक धम्मदीक्षा समारोह समिती, नागपूर व सत्यशोधक ओबीसी परिषद, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने या समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. . धम्मदीक्षा घेण्याआधी सर्वांकडून अर्ज भरून घेण्यात आला. त्यानंतर त्यांना एक नामावली देण्यात आली. यात ‘बुद्ध ‘ नाव असलेली यादी देण्यात आली. त्यांच्या आवडीनुसार त्यांना नामबदलही करण्याची संधी देण्यात आली.