बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी कॅम्प परिसरातील महावितरणाच्या डीपी बाॅक्सची दुरुस्ती करा ;अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी कॅम्प परिसरातील महावितरणाच्या डीपी बाॅक्सची दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसैनिक मातोश्री संस्थेचे अध्यक्ष गणेश आहेर यांनी प्रसिध्दीपञकाच्या माध्यमातुन केली आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पिंपरी कॅम्प परिसरातील महावितरणाच्या डीपी बाॅक्स मोकळ्या स्वरूपात असल्याने येथे सर्रासपणे चोरीच्या लाईन टाकल्या जात आहेत. संपूर्ण पिंपरी कँम्प परिसरात उघड्या डीपी बाॅक्सची संख्या मोठया प्रमाणात असल्याने डीपी बाॅक्सची दुरूस्ती त्वरीत करण्यात यावी. पिंपरी कँम्प हा परिसर नेहमी गजबजलेला परिसर असल्याने या ठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

त्वरीत या ठिकाणच्या डीपी बाॅक्सची दुरूस्ती करण्यात यावी अन्यथा शिवसेना स्टाईलने महावितरण कार्याल्यावर आदोंलन छेडण्यात येईल असा इशारा देखील गणेश आहेर यांनी प्रसिध्दीपञकाच्या माध्यमातून महावितरण आधिका-यांना दिला आहे.

Share this: