आरोग्यमाझं पिंपरी -चिंचवड

चिंता वाढली! पिंपरी चिंचवडमधील एकाच दिवशी कोरोनाग्रस्तांची संख्या एकहजार पार

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी-चिंचवडकरांची चिंता वाढली असून शहरांतील कोरोनाचा विळखा वाढतच चालला आहे. आज दिवसभरात शहराच्या विविध भागातील १०७९ जणांना आज (शनिवारी) कोरोनाची लागण झाली आहे . त्यामुळे आजपर्यंतची शहरातील ही सर्वाधिक रुग्णवाढ आहे. तर शहरातील रुग्णसंख्या१५ हजार ६३२ वर पोहोचली आहे.

दहा दिवसांच्या लॉकडाउनंतर लागू झालेल्या ‘अनलॉक’च्या पहिल्यादिवशी 843 तर दुस-या दिवशी तब्बल 1 हजार 79 नवीन रुग्णांची भर पडली आहे. यावरुन शहरात कोरोनाची साखळी घट्ट झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

आज 16 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पिंपळेगुरव येथील 70 वर्षीय पुरुष, संत तुकाराम नगर पिंपरीतील 56 वर्षीय पुरुष, पिंपरीतील 64 वर्षीय महिला आणि 80 वर्षीय वृद्ध, चिंचवड येथील 38 वर्षाचा युवक, 74, 95 वर्षीय दोन वृद्ध, दापोडीतील 45 वर्षीय पुरुष, नेहरुनगर येथील 75 वर्षीय वृद्ध, चऱ्होलीतील 67 वर्षीय पुरुष, मोहननगर येथील 67 वर्षीय पुरुष आणि म्हाळुंगेतील 38 वर्षाचा युवक, विश्रांतवाडीतील 72 वर्षीय वृद्ध महिला, बालेवाडीतील 85 वर्षीय वृद्ध, मुळशी येथील 98 वर्षीय पुरुष, हिंजवडीतील 84 वर्षीय वृद्ध महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Share this: