पिंपरी चिंचवडमधील तीन परिसर ‘कंटेन्मेट झोन’ म्हणून घोषित;महानगरपालिकेचा आदेश
पिंपरी (वास्तव संघर्ष) – पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी अधिक संख्येने रुग्ण आढळणारे शहरातील तीन परिसर कन्टेन्मेट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत . खबरदारीचा उपाय म्हणून हे भाग सील करण्यात आले आहेत . पिंपरी गावठाण आणि थेरगावातील भागांचा यात समावेश आहे . पुढील आदेश येईपर्यंत हे भाग सील करण्यात आले आहेत .
यामध्ये पिंपरी गावठाण, भीमनगर, गणेशनगर, थेरगाव परिसर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून कंटेन्मेट झोन घोषित केला आहे.
रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी पिंपरी गावठाणातील (पवनेश्वर मंदिर, कापसे चौक, शिवकृपा, पीसीएमसी कॉलनी, काशिबा शिंदे सभागृह), तसेच पिंपरी भीमनगरमधील (शिवाजी महाराज पुतळा-गंगवा चौक,-समृद्धी हॉटेल- सौदागर पूल काटे पिंपळे रस्ता) हे भाग सील करण्यात आले आहेत.
याशिवाय गणेशनगर, थेरगाव येथील (वाकड पोलीस स्टेशन चौक-शिवकॉलनी कमान- ओमकार कॉलनी लेन -2 – रत्नदीप कॉलनी- मयूरबाग कॉलनी- मयूरेश्वर गणेश मंदिर – लोकमान्य कॉलनी) हा परिसर कंटेन्मेट झोन घोषित केला आहे. पुढील आदेशापर्यंत हा भाग सील असणार आहे.
या परिसरात सकाळी आठ ते दुपारी बारा या वेळेत जीवनावश्यक वस्तुंची खरेदी करता येणार आहे. तर, मेडीकल व दवाखाने पूर्ण वेळ खुली राहणार आहेत.बाहेरुन ऑनलाइन पद्धतीने खाद्यपदार्थ मागविण्यास मनाई करण्यात आली आहे. या परिसरातून नागरिकांना बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.