सावित्रीमाई फुले वादग्रस्त विधानाबद्दल महापौर दालनासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकांचे आंदोलन
पिंपरी (वास्तव संघर्ष) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्द्ल पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा ढोरे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे . आता पिंपरी-चिंचवड शहरातील विरोधकांनी महापौर उषा ढोरे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली .
यासंदर्भात आज सकाळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी महापौर उषा ढोरे यांच्या दालनाबाहेर निषेध व्यक्त केला. पिंपरीचिंचवड महापौर माई ढोरे यांनी क्रांतीज्योती साविञीमाई फुले यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करत आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने महापौर दालनात आंदोलन करण्यात आले.माई ढोरे यांनी महापौर पदाचा राजिनामा द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
यावेळी महिला अध्यक्षा वैशालीताई काळभोर, माजी महापौर तथा नगरसेवक वैशालीताई घोडेकर नगरसेविका सुलक्षणा धर-शिलवंत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.