आमदार प्रणिती शिंदेच्या फोटोला काळे फासून जोडो मारो आंदोलन ;’वंचित’ च्या महिला कार्यकर्त्यांनी केला निषेध
पिंपरी (वास्तव संघर्ष) : सुधारित भारतीय नागरिकत्व कायदा, मागासवर्गीयांच्या आरक्षणावर देशभर आंदोलने होत असताना डॉ. बाबासाहेबांचे रक्त कुठे आहे, असा सवाल आमदार प्रणिती शिंदे यांनी जाहीर भाषणातून केला होता .
आमदार प्रणिती शिंदे यांच्या या वक्तव्याचा निषेध करीत वंचित बहूजन आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांनी पिंपरीतील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चोकात जोडे मारो आंदोलन केले यावेळी कार्यकर्त्यांनी आमदार शिंदे यांच्या फोटोला काळे देखील फासले.
वंचीत बहुजन आघाडीच्या महिलाध्यक्ष लताताई रोकडे, सीमाताई भालेसईन, भिमाताई तुळवे (अध्यक्ष माता रमाई महिला मंच महाराष्ट्र) राज्य, शारदाताई बनसोडे (कोषाध्यक्ष), निर्मला कांबळे( उपाध्यक्ष), सुनीता शिंदे (महासचिव), नंदा जाधव (महासचिव), अनिता जाधव (महासचिव), नमिता जाधव( संघटक), बशीरा शेख, मंदाकिनी गायकवाड,साधना मेश्राम,संगीता बनसोडे,विमल मगरे.
देवेंद्र तायडे,राजेश बारसागडे,के. डी. वाघमारे,रहीम सय्यद
गुलाब पानपाटील,संजय वाघमारे,शिवशंकर उबाळे
विजय गेडाम या आंदोलनात यांनी सहभाग घेतला.