बातम्यामहाराष्ट्र

कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माझं विधान मागे घेतो-वारीस पठाण

मुंबई – कर्नाटकातील गुलबर्गामध्ये एका कार्यक्रमात”१०० कोटींवर आम्ही १५ कोटी भारी पडू” असे भडखाऊ भाषणावरून  देशभरातून एम आय एमचे मुंबई भायखळ्यातील माजी आमदार वारीस पठाण यांच्यावर कडाडून टीका करण्यात आली. त्यांना  देशभरातून मोठ्या रोषाचा सामना करावा लागला. यानंतर आपल्यावर कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो, या पार्श्वभूमीवर वारीस पठाण यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत आपण केलेले विधान मागे घेत असल्याचे म्हटले आहे .वारीस पठाण यांनी मुंबईतील वांद्रे भागात पत्रकार परिषद घेत आपले विधान मागे घेतले आहे,

या पञकार परिषदेत वारीस पठाण म्हणाले की, सर्वधर्म समभाव ही या देशाची खासियत आहे. आपल्यात  काही मुद्द्यांवर मतमतांतरं असू शकतात आणि लोकशाहीत असे असायला असायलाही हवे आहे . हा अधिकार आपल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिला आहे . त्यामुळे मी पुन्हा एकदा स्पष्ट करी इच्छितो की मी असे कोणतही वक्तव्य केलेलं नाही, ज्याचा वेगळा अर्थ काढून मला निशाणा बनवले जात आहे . यामध्ये केवळ राजकीय षडयंत्रातून मला आणि माझ्या पार्टीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय.

तरीही माझ्या कुठल्या विधानामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माझं विधान मागे घेतो. मी या देशाचा एक सच्चा नागरिक आहे आणि मला मी भारतीय असल्याचा अभिमान आहे. जय हिंद यावेळी असे वारीस पठाण म्हणाले आहे माञ त्यांनी या पञकार परिषदेत माफी मागितली नाही.

Share this: