क्राईम बातम्यामहाराष्ट्र

अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा बरळली ॲट्रॉसिटी प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल 

नवी मुंबई :  मराठी अभिनेत्री केतकी चितळे ही चर्चेत राहण्यासाठी काहीही बरळत असते याआधी तीने मराठी भाषेबद्दल अपशब्द काढल्याने गुन्हा दाखल आहे आता ती पुन्हा एकदा बरळली असून तीने समाजात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणि  बौद्ध समाजाविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी  अभिनेत्री केतकी चितळे हिच्या विरोधात रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिची फेसबुक पोस्ट व्हायरल झाल्यांनतर नवी मुंबई तील आंबेडकरी चळवळीतील युवा कार्यकर्ते स्वप्निल गोविंद जगताप यांनी रबाळे पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली होती. त्यानुसार केतकी चितळे हिच्यावर अनु. जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

स्वप्निल गोविंद जगताप (वय २६.रा.घणसोली पुर्व मुंबई) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, केतकी चितळे यांनी बौद्ध समाजाविषयी आक्षेपार्ह विधान फेसबुक या सोशलमिडीयावर केले होते तसेच सुरज शिंदे या समाजकंटकाने त्या विधानाचे समर्थन केले आणि महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले  यांच्याविषयी गरळ ओकळी आहे. त्यामुळे केतकी चितळे आणि सुरज शिंदे नामक आरोपींनी महापुरूषांचा अवमान केला आहे. त्यानुसार या दोघांविरुद्ध अनु. जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक (एट्रोसिटी) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this: