धक्कादायक :भीमा-कोरेगाव हिंसाचारातील आरोपींची सुटकेची प्रधानमंत्रीकडे मागणी
नवी दिल्ली : १ जानेवारी २०१८ रोजी विजयस्तंभास अभिवादन करण्यास देशभरातून आलेल्या भीम अनुयायांवर अमानुष असा अत्याचार करत हिंसाचार झाला होता. या हिंसाचाराला जवाबदार आरोपीना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी यासाठी आजतागायत प्रयत्न होत आहेत.
माञ आता भीमा-कोरेगाव हिंसाचारातील आरोपींची सुटका करण्याची धक्कादायक आणि अजब मागणी गैर सरकारी संघटना एमनेस्टी इंटरनॅशनलने केली आहे. निरपराध लहान मुले, पुरुष स्ञीयांवर हिंसाचार करणारे आरोपी मोकाट आहेत. हे आरोपी हिरो असल्याचे या संघटनेने म्हटले आहे. मानवाधिकार कार्यकर्त्यांवर हल्ला करणे हे देशहितार्थ नसल्याचे सांगत या आरोपींच्या सुटकेची मागणी त्यांनी प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांच्याकडे केली आहे. संपूर्ण जग या घटनेकडे पाहतोय त्यामुळे प्रधानमंत्री मोदींनी या घटनेत हस्तक्षेप करण्याची गरजही या संघटनेने व्यक्त केली आहे.
प्रधानमंञी मोदींनी भीमा-कोरेगाव संघटनेतील आरोपींची सुटका करावी अशी मागणी एमनेस्टी इंटरनॅशनलने केली आहे. मानवाधिकार कार्यकर्त्यांवर खोटे आरोप लावले जात आहेत. अटक केलेल्या कार्यकर्त्यांना देशद्रोही ठरवले जात आहे. नऊ कार्यकर्त्यांची अटक म्हणजे देशातील मानवाधिकार दाबण्याचा प्रयत्न असल्याचे एमनेस्टी इंटरनॅशनलने केली आहे.भीमा-कोरेगाव प्रकरणात नऊ आरोपींना अटक करण्यात आली होती. या निर्दोष कार्यकर्त्यांना मुक्त करण्याची अजब मागणी एमनेस्टी इंटरनॅशनल करत आहे.