क्राईम बातम्याबातम्यामहाराष्ट्र

त्या आक्षेपार्ह पोस्टरवरून संभाजी ब्रिगेड आक्रमक ; चला हवा येऊ द्या’ तील कलाकारांसह विकृत मेंदूला धडा शिकवणार

चला आता केवळ हवाच नाही तर याच्या डोक्या मागील सडका मेंदू शोधून काढू आणि कलाकारांसह विकृत मेंदूला पण धडा शिकवू

पुणे (वास्तव संघर्ष) झी मराठी टेलीविजन वाहीनीवर सुरू असणाऱ्या ‘चला होऊ द्या’ या शोमध्ये छञपती सयाजीराव गायकवाड आणि राजश्री छञपती शाहू महाराज यांच्या मुळ प्रतिमेला छेडछाड करणाऱ्या ‘चला हवा येऊ द्या’ च्या कलाकारांसह विकृत मेंदूला पण धडा शिकवू अशी चेतावणी संभाजी ब्रिगेड, पुणे शहर अध्यक्ष असे प्रशांत धुमाळ यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

धुमाळ यांनी या निवेदनात म्हटले आहे, चला हवा येऊ द्या या अतिशहाण्या लोकांच्या शो मध्ये छञपती सयाजीराव गायकवाड आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या मूळ तसबीरीला फोटोशॉप करून स्वताचे थोबाड चिकटवणारे विनोदासाठी त्याचा वापर करणारे कुशल बद्रिके आणि भाऊ कदम या हरामखोर लोकाचा जाहीर निषेद आंबट पांचट पंच मारून आपल्या मालकांना खुश करणाऱ्या या लोकांना या दोन महापुरुषांनी समाजासाठी जे काम उभं केलं त्याचं अपमान चार पैसे आणि दोन टाळ्या यासाठी कुठल्याही थराला जाणारी ही कलकार मंडळी आहेत.

बहुजन समाजाचा सर्व जाती धर्मातील मुलांसाठी मोफत व सक्तीचे शिक्षण करणारे ही सर्व मंडळी महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारख्या समाजसुधारकांना मदत करनारे ,आरक्षणाची संकल्पना मांडून इथल्या बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणणारे त्यांच्या विचारांची उंची गेली १०० वर्ष मोजायला अजून कोणाला जमल नाही पण या शो चा निवेदक साबळे, फोटोशॉप मधील टुकार बद्रिके आणि कदम, शो चे निर्माते आणि झी वाहिनी यांनी मात्र विनोद म्हणून या महापुरुषांची अवहेलना करून या महाराष्ट्राचा अवमान केला आहे घडल्या प्रकाराबद्दल जाहीर माफी मागावी अन्यथा योग्य ते उत्तर देण्यात येईल

Share this: