बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात तीन रूग्णांना कोरोना विषाणूची लागण

File Photo

पिंपरी (वास्तव संघर्ष) – पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल केलेल्या पाच संशयितापैंकी तीन पुरुष रुग्णांच्या द्रावाचे नमुने पॉझिटीव्ह ‘ आले आहेत . मात्र कोरोना विषाणूची लक्षणे दिसून आले नाहीत .  खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना पुढील 14 दिवस वायसीएम रुग्णालयातील विलगीकरण कक्षात निगराणी खाली ठेवण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज ( गुरुवारी ) पत्रकार परिषदेत दिली .

तसेच नागरिकांनी ‘ कोरोना ‘ संदर्भातील माहितीसाठी सारथी हेल्पलाईनच्या 8888006666 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे . दुबईतून पिंपरी – चिंचवड शहरात आलेल्या तीन रुग्ण आणि संशय आल्याने स्वत : हून दोघे महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल झाले होते . त्यांच्या घशातील द्रावाचे नमुने पुण्यातील एनआयव्ही येथे तपासणीसाठी पाठविले होते . त्यापैकी दुबईवरुन आलेल्या तीन पुरुषांचे अहवाल ‘ पॉझिटीव्ह ‘ आल्याचे स्पष्ट झाले आहे . तर , दोघांचे अहवाल निगेटीव्ह आले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे .असे आयुक्त पिंपरी-चिंचवड महापालिकेचे श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

दुबई येथून शहरात परतल्यानंतर त्या पाच संशयीतांची तपासणी करण्यात आली होती. त्यातील तिनजण पॉझिटिव्ह असून ते किवळे आणि ताथवडे भागातील राहत असल्याची माहिती आहे. अन्य दोनजणांना करोनाचा कसलाही संसर्ग झाल्याचे आढळून आलेले नाही. त्यामुळे त्यांना तपासणी झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.असेही हर्डीकर म्हणाले

Share this: