बातम्या

महामानवाला अभिवादन करण्यासाठी लाखो भीमसागर चैत्यभूमीत

वास्तव संघर्ष – विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा ६३ वा महापरिनिर्वाण दिन .देशभरतील लाखो भीम अनुयायी मुंबईतील दादर येथिल चैत्यभूमीत १ डिसेंम्बर पासून दाखल झालेत त्यात वयस्क, मध्यम आणि तरुण व बालक असल्या सर्व वयाचे अनुयायी दाखल झाले आहेत.

मिळेल ते वाहन आणि जमेल तसे देशभरातून लोक महामानांवाना अभिवादन करण्यासाठी येत असतात दरवर्षी त्या संख्येत लाखोंची भर पडते .

याच दरम्यान भारतीय रेल्वेच्या उत्पन्नात करोडोची भर पडते .
आपल्या लाडक्या आणि प्राणप्रिय युगंधर नेत्याला आदरांजली वाहन्यासाठी भीम अनुयायी जगभरातून जसे जमेल तसे प्रयत्न करीत असतो

ज्या महामानांवाने साऱ्या वंचित आणि उपेक्षित जगाचा जगण्याचा अमुलाग्रह बदल घडविला त्या युगपुरुषाला अर्थात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे जनसंपर्क विभागामार्फत ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित छायाचित्रांचे प्रदर्शन उभारण्यात आले आहे. तसेच ६३ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रकाशित माहिती पुस्तिका विनामूल्य वितरित करण्यात येत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या या अनुयायांसाठी शिवाजी पार्क व परिसरात चोख व्यवस्था तसेच सेवासुविधा पुरविण्यात आल्या आहेत. सात शाळांमध्ये तात्पुरता निवारा, शामियाना व व्हीआयपी कक्षासह नियंत्रण कक्षाची व्यवस्था, तीन ठिकाणी रुग्णवाहिकेसहित आरोग्यसेवा, एक लाख चौरस फूट क्षेत्रफळाच्या मंडपात तात्पुरता निवारा. २५ फिरती शौचालये, ३८० पिण्याच्या पाण्याच्या नळांची व्यवस्था. मोबाईल चार्जिंगकरिता शिवाजी पार्क येथे ३०० पॉइंटची व्यवस्था, मैदानात धुळीचा त्रास रोखण्यासाठी पायवाटांवर आच्छादनाची व्यवस्था अशा या सुविधा आहेत. याचसोबत अनुयायांसाठी अनेक सामाजिक संस्थांनी भोजन व्यवस्था केली आहे.

Share this: