पिंपरी चिंचवड पालिकेच्या स्थायी समितीतील क्लार्क आणि पिए यांची सखोल चौकशी लावावी ;वंचीत बहुजन आघाडीची मागणी
पिंपरी(वास्तव संघर्ष) – आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचेत नाव आहे. पिंपरी चिंचवड शहरातील सर्वसामान्य नागरिकाच्या घामाच्या कष्टातून मिळालेल्या कररुपी पैशातून ही इमारत उभी आहे. याच महापालिकेत स्थायी समिती सभागृह आहे. याच समितीत शहरातील विविध विकासकामाची आर्थिक घडी बसवली जाते.
शासकीय कार्यालयात कोणताही व्यक्ती रूजू झाल्यावर तीन वर्षापेक्षा जास्त काळ तेथे काम करु शकत नाही असे संविधानातील कायद्यात लिहिले आहे. स्थायी समितीतील क्लार्क दिनेश आटवाल
पिए ज्ञानेश्वर पिंगळे यांची सखोल बदली करून चौकशी लावत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी वंचीत बहुजन आघाडी युवक कार्याध्यक्ष अॅड. मिलिंद कांबळे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केली आहे. तसेच यासंदर्भात कांबळे यांनी माहीतीअधिकार कायद्यानुसार माहीती देखील मागवली आहे.
त्यानुसार कांबळे म्हणतात की,पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत दिनेश आटवाल हे 20-1 2011 रोजी स्थायी समितीत शिपाई या पदावर रूजू झाले होते. त्यानंतर 14-3-2018 रोजी त्याच ठिकाणी त्यांची वर्णी लागून त्यांना शिपाई पासून लिपिक करण्यात आले. आणि येथे असणारे मुख्यलिपीक ज्ञानेश्वर पिंगळे यांची नेमणूक 9-6-2016 रोजी झाली असून अजूनही तेथे त्याच पदावर कार्यरत आहेत.
या दोघांचेही तीन वर्षे पूर्ण झाली असून शिपाई ते लिपीक असा प्रवास येथील दिनेश आटवाल यांनी येथेच केलेला दिसून येतोय. या दोघांवरही महापालिका इतकी मेहरबान का?स्थायी समितीमधील गैरव्यवहार नागरिकांसमोर येऊ नये म्हणून यांना येथे कायमस्वरूपी ठेवले आहे काय? असे प्रश्न उपस्थित होतात.
दरम्यान, या सर्व प्रकाराबाबत आयुक्तांनी सखोल चौकशी लावावी अन्यथा जवाब दो आंदोलन करण्यात येणार असल्याचे अॅड. मिलिंद कांबळे यांनी सांगितले.