पोटाच्या भुकेसाठी नागरिकांची दगडफेक ;आनंदनगर झोपडपट्टीतील 48 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल
पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड शहरातील आनंदनगर झोपडपट्टीत कोरोना व्हायरस झपाट्याने वाढत असून आतापर्यंत येथे दोनशेच्या आसपास कोरोना बाधित रुग्णांची संख्या आढळून आली आहे. यामुळे ही झोपडपट्टी पुर्णपणे सिल करण्यात आली आहे. माञ पोटात खायला नाही लहान मुले भुकेने व्याकूळ होऊन रडत आहेत. याचा विचार प्रशासन करत नसल्याने सोमवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास येथील नागरिक रस्त्यावर उतरले .
आपसांत संगनमत करून मोठा जमाव जमविला . बाहेर सगळे व्यवहार सुरू झाले आहेत . प्रतिबंधित क्षेत्राच्या नावाखाली मग आम्हालाच येथे का डांबून ठेवले आहे आमच्यासोबत राजकारण केले जात आहे . करोनामुळे कोणी मरत नाही . आम्हाला येथून बाहेर जाऊद्या असे म्हणत या रहिवाशांनी दगडफेक केली.
सहायक निरीक्षक रोहिणी शेवाळे यांनी याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .
लक्ष्मण ठोकळ , संदीप वर्मा ( दोघेही रा . पत्राशेड , लिंक रोड , चिंचवड ) , विकास जाधव , रमेश कांबळे आणि तेजस मलेश गोपरेडी ( सर्व रा . आनंदनगर , चिंचवड ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत . तर देवनूल , विशाल मोरे , करण बोरूले , धन्या खंडागळे , बाळ्या , मुसा , बाब्या , विशाल भोसले , मल्हारी कांबळे , धीरज म्हस्के , महादेव सरोदे , विमल गायकवाड , शीला कांबळे , कलावती सोनटक्के , रेश्मा कांबळे , रोहन आसोदे , राहूल चलवादी , रोहित गोंदणे व इतर 25 महिला व पुरूष यांच्या विरोधातही दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .